खडकी बाजारात दोघांवर गोळीबार: दोघांना अटक, पिस्तूल उगारून दहशत

Date:

पुणे-खडकी बाजार परिसरात पूर्ववैमनस्यातून दोघांवर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात दहशत माजली होती. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.या प्रकरणी सुदर्शन अडसूळ (वय २५, रा. गवळवाडा, खडकी बाजार) आणि त्याचा साथीदार रचिन्मय (वय २५) यांना अटक करण्यात आली आहे. आकाश संजय वाघमारे (वय २४, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, महादेववाडी, खडकी) याने खडकी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे आणि आरोपींमध्ये यापूर्वी वाद झाले होते, ज्याबाबत पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी आरोपी आणि त्याचे साथीदार फिर्यादीवर दबाव आणून त्याला धमकावत होते.

घटनेच्या दिवशी, वाघमारे आणि त्याचा मित्र दुचाकीवरून खडकीतील राजीव गांधीनगर परिसरात आले होते. त्यावेळी आरोपी अडसूळ आणि त्याचा साथीदार चिन्मय तिथे आले. त्यांनी वाघमारे आणि त्याच्या मित्राला शिवीगाळ केली. ‘वाघमारे आणि त्याचा मित्र हे चांदणे टोळीतील आहेत, या दोघांना गोळ्या घाला’ असे सांगून अडसूळने चिन्मयच्या कमरेला खोचलेले पिस्तूल बाहेर काढले. त्याने वाघमारे आणि त्याच्या मित्रावर पिस्तूल रोखले आणि गोळी झाडली, असे वाघमारेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

गोळीबारानंतर आरोपींनी पिस्तूल उगारून परिसरात दहशत माजवली आणि ‘सगळ्यांचा हिशेब चुकता करू’ अशी धमकी देऊन तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त विठ्ठल दबडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींना नंतर अटक करण्यात आली असून, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण गायकवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नागरिकांनी घर सुचीकरण व गृहगणनेच्या कार्यात सहकार्य करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. १६: भारताच्या १६ व्या जनगणनेच्या अनुषंगाने जिल्ह्यात...

नीट पेपरफुटी:पुण्यातील प्राध्यापिका मनीषा मांढरेला दिल्लीत अटक:आतापर्यंत 9 आरोपींना अटक

नीट (यूजी) परीक्षेचा पेपरफुटी प्रकरणातील मनीषा मांढरेच्या ...

भारतात कुठे भीषण दुष्काळ,तीव्र उष्णता तर कुठे मुसळधार पाऊस:अल निनो इफेक्ट जाणवणार

अल निनो जुलैपर्यंत सक्रिय, थंडीपर्यंत राहण्याची शक्यता, यामुळे मान्सून...

मोदी म्हणाले-मोदी म्हणाले-परिस्थिती बदलली नाही तर गरिबीच्या दलदलीत अडकू…

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्सच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी द हेगमध्ये...