लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सकडून पिंपरी-चिंचवडमध्ये मॉलवर फायरिंग,व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण

Date:

पुणे :- पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. कोयता गँगच्या वाढत्या दहशतीनंतर आता लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रसिद्ध ‘एजे फर्निचर मॉल’वर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या प्रकारानंतर पोलिस यंत्रणा तातडीने सक्रिय झाली असून शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी मॉलसमोर येत थेट गोळीबार सुरू केला. त्यांच्या हातात दोन पिस्तुलं होती आणि त्यांनी मॉलच्या दिशेने पाच ते सहा राऊंड फायर केले. गोळ्या मॉलच्या नेमप्लेट आणि काचेवर लागल्याने मोठे नुकसान झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. गोळीबार केल्यानंतर आरोपी काही क्षणांत घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

या प्रकरणाला आणखी गंभीर वळण तेव्हा मिळाले, जेव्हा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर पोस्ट करत या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली. या पोस्टमध्ये एजे फर्निचर मॉलचे मालक अशोक नैन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच हा फक्त ट्रेलर आहे, पुढची गोळी थेट डोक्यात असेल, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे व्यावसायिकांना लक्ष्य करून टोळ्यांकडून दबाव टाकला जात असल्याची चर्चा रंगली आहे. पोलिसांकडून या सोशल मीडिया पोस्टची सत्यता आणि त्यामागील व्यक्तींची पडताळणी केली जात आहे.

दरम्यान, या घटनेनंतर आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या ऑडिओमध्ये स्वतःला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आरजू बिश्नोई असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. जो आमच्या विरोधात जाईल, त्याची आमच्यासोबत लवकरच भेट होईल, असा धमकीवजा इशारा या क्लिपमध्ये देण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, हा ऑडिओ खरोखरच बिश्नोई गँगशी संबंधित आहे की नाही, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. तरीही या प्रकरणामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या प्रभावाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

या हल्ल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली असून शहरातील विविध भागांमध्ये तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त गणेश इंगवले यांनी सांगितले की, घटनास्थळावरून महत्त्वाचे फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून प्रशासनावरही दबाव वाढताना दिसत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात रंगणार सहावा सुपरहिट ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’!

(शरद लोणकर) मराठी चित्रपटसृष्टीतील वैविध्यपूर्ण कथा, नव्या विचारांची मांडणी आणि...

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेवरून केंद्र सरकारवर काँग्रेसचा निशाणा

सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीचे काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांच्याकडून स्वागत पुणे...

… मोदी, खुर्ची खाली करा’

पेट्रोल, डिझेलचे दर कमी करा-स्वाती शिंदे, अध्यक्ष पुणे शहर...