शरद पवार गटाच्या २५२ इच्छुकांच्या मुलाखती संपन्न

Date:

पुणे-आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जाहीर केल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शहरातील ८ विधानसभा मतदारसंघातून तब्बल २५२ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे असलेला इच्छुक उमेदवारांचा हा कल जनतेच्या मनातील कौल स्पष्ट करणारा आहे अशी भावना शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचे प्रयत्न सुरू असले तरी स्वबळावर देखील निवडणूक लढण्यासाठी आम्ही सज्ज आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत आम्ही हात मिळवणी करणार नाही. भाजपने स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहर बकाल करण्याचे काम केले असून कोणताही ठोस विकास त्यांना करता आलेला नाही.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे हे शहरातील सर्व इच्छुक उमेदवारांशी आज संवाद साधून त्यांची मते देखील जाणून घेणार आहेत असे यावेळी जगताप यांनी सांगितले आहे.

आ.बापूसाहेब पठारे, माजी.खा. वंदना चव्हाण, माजी.आ. अशोकबापू पवार, माजी. आ. जयदेवराव गायकवाड, अंकुश काकडे, अश्विनी कदम,रवींद्रअण्णा माळवदकर, भगवानराव साळुंखे, डॉ. सुनील जगताप, निलेश निकम, विशाल तांबे, काकासाहेब चव्हाण, स्वाती पोकळे, उदय महाले, पंडित कांबळे यांच्यासह शहरातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई.दि.२४: राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि...

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार

संसदेतील सर्वोत्तम कामगिरीचा सलग दुसऱ्या वर्षी गौरव पुणे: संसदेतील सर्वोत्तम...

सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे

फुले, गांधी, नेहरू विचारमंच आयोजित "महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद"...

केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाचे काम 20 दिवसात झाले नाही तर…नगरसेवक अजित घुलेंचा इशारा

पुणे- केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाच्या कामासाठी २० दिवसांची मुदत देत...