पुणे – एमएनजीएलच्या वतीने 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एमएनजीएलचे कार्यकारी संचालक कुमार शंकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी एमएनजीएलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
आज देशभरात 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. एमएनजीएलच्या वतीने ही 75 व्या प्रजासत्ताक दिनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एमएनजीएलचे कार्यकारी संचालक कुमार शंकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालिका बागेश्री मंठाळकर (स्वतंत्र) यांच्यासह एमएनजीएलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना कार्यकारी संचालक कुमार शंकर म्हणाले की, केंद्र सरकार अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रावर विशेष भर देत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या घरात गॅस कनेक्शन देऊन, प्रदूषणमुक्त भारत करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे उद्दीष्ट आहे. त्यामुळे घरगुती PNG कनेक्शनच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. सध्या एमएनजीएलच्या माध्यमातून सध्या पुणे महानगरासह धुळे, नाशिक, सिंधुदुर्ग, बुलढाणा, नांदेड ,परभणी आदी जिल्ह्यांत सीजीडी प्रकल्प राबवित आहे.
बागेश्री मंठाळकर म्हणाल्या की, तरुण पिढीला मानवतेबद्दल शिक्षित करण्यासाठी सामाजिक जबाबदारीच्या महत्त्वावर भर दिला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.