पुण्यातील बहुतांश भागाचा पाणी पुरवठा गुरूवारी बंद; पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन
पुणे- गेल्यावर्षापेक्षा १६ टक्के पाणीसाठा जास्त ,तरीही पुणेकरांनो पाणी जपून वापरा असे आवाहन पुणे महापालिकेकडून करण्यात आले आहे आणि पाणी कपातीचे संदेश देखील देण्यात आले आहेत . गेल्यावर्षी आजच्या दिवशी पुण्याच्या चारही धरणात ७२.८६ टक्के एवढा पाणी साठा झाला होता तर यंदा आज ८८. टक्के पाणीसाठा संध्याकाळपर्यंत जमा झालेला आहे. म्हणजे १६ टक्के पाणी साठा यंदा जास्त झालेला आहे.
वीजपुरवठा बंद त्यामुळे पाणी बंद -महापालिकेचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीतर्फे पर्वती उपकेंद्र येथे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी ( ता. १०) पर्वती जलकेंद्र (जुने व नवीन) लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी पंपींग व वडगाव जलकेंद्र येथील वीजपुरवठा बंद राहणार आहे.
त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद रहाणार आहे. शुक्रवारी (ता. ११) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.
वारजे जलकेंद्राच्या अंतर्गत असणारा कोथरू़ड, डेक्कन, कर्वेनगर, शिवाजीनगर, बालेवाडी, पाषाण या भागातील या भागातील पाणी पुरवठा सुरू रहाणार आहे.
या भागातील पाणी पुरवठा बंद असेल
पर्वती एम एल आर टाकी परिसर:- गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.
पर्वती एच एल आर टाकी परिसर :- सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-१ व २ लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट,
ढोलेमळा, सॅलेसबरी (पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सव्हें नं ४२,४६ ( कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर, इत्यादी. पर्वती एल एल आर परिसर शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर,
एस.एन.डी.टी. एम. एल. आर. टाकी परिसर : एरंडवणा, कर्वेरोड, प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, भांडारकर रोड, हैपी कॉलनी, गोसावी वस्ती, मयूर कॉलनी, सहवास सोसा परिसर गिरीजा शंकर विहार, दशभुजा गणपती परिसर, वकील नगर, पटवर्धन बाग, डीपी रोड, गुळवणी महाराज रोड, गणेशनगर, राहुल नगर, करिष्मा सोसा, संगमप्रेस रोड, सिटी प्राईड परिसर, आयडीयल कॉलनी इ.
चतुःश्रृंगी टाकी परीसर – औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानाश्री सोसयटी, नॅशनल, सिंध सोसायटी, औंध गाव परिसर
लष्कर जलकेंद्र भाग :– लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परीसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.
वडगाव जलकेंद्र परीसर :– हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळेकरनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इ.