विक्रीयोग्य परिसर ४.८ लाख चौरस फुट असून ९५० कोटी रुपयांची एकूण विक्री होण्याचा अंदाज, गोरेगावमध्ये वसलेल्या या प्रकल्पांमुळे कंपनीचे एमएमआरमधील स्थान अधिक बळकट होणार
आर्थिक वर्ष २४ मध्ये कंपनीने पुणे आणि एमएमआरमधे विविध प्रकल्पांचे संपादन केले असून त्यांची एकूण संभाव्य विक्री ३४५० कोटी रुपये
पुणे, २ ऑगस्ट २०२३ – कोलते- पाटील डेव्हलपर्स लिमिटेड (BSE: 532924, NSE: KOLTEPATIL; KPDL), या पुणेस्थित रियल इस्टेट कंपनीचा मुंबई व बेंगळुरूमधील विस्तार वाढत असून कंपनीने नुकतेच मुंबईतील पश्चिम उपनगरांतील दोन सोसायटींच्या रिडेव्हलपमेंट करारावर सह्या केल्या. या प्रकल्पांचा एकूण विक्रीयोग्य परिसर ४.८ लाख चौरस फुट असून त्यातून एकूण ९५० कोटी रुपयांची एकूण विक्री होईल असा अंदाज आहे. या दोन नव्या प्रकल्पांमुळे पुण्याबाहेर धोरणात्मक विस्तार करण्याच्या कंपनीच्या योजनेला बळ मिळणार असून मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमधील (एमएमआर) स्थान मजबूत होईल. यामुळे आर्थिक वर्ष २४ मध्येही कंपनीचा विकास सुरू राहील.
हे दोन्ही प्रकल्प गोरेगाव (प) येथील बांगूर नगर या लघुबाजारपेठेत मोक्याच्या जागी वसलेले आहेत. यामुळे कंपनीच्या मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमधील (एमएमआर) प्रकल्पांची एकूण संख्या १४ वर गेली आहे. बांगूर नगर हा निवासी परिसर असून मुंबईतील विविध भागांशी चांगल्या प्रकारे जोडलेला आहे. मालाडचे कॉर्पोरेट हब येथून जवळ आहे तसेच येथील सामाजिक पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारे विकसित झालेल्या आहेत. कंपनीने आतापर्यंत आपल्या निवासी रिडेव्हलपमेंट प्रकल्पांद्वारे लघु बाजारपेठांमध्ये यशस्वी कामगिरी केली असून त्यात एकूण २.७७ लाख चौरस फुटांची विक्रीयोग्य जागा असलेल्या वर्व्ह निवासी प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पाची पूर्ण विक्री झाली असून एकूण विक्री मूल्य ४९५ कोटी रुपयांवर गेले आहे.
या घडामोडीविषयी कोलते- पाटील डेव्हलपर्स लि.चे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल तळेले म्हणाले, ‘या दोन नव्या प्रकल्पांचा समावेश, पुण्याबाहेर वैविध्यपूर्ण व्यवसाय विस्तार आणि विकास करण्याच्या आमच्या ध्येयाच्या मार्गातील महत्त्वाचा टप्पा आहे. आम्ही एमएमआरमध्ये लक्षणीय आणि वेगाने विस्तार केला असून मुंबईच्या पश्चिम उपनगरांत यशस्वीपणे प्रकल्पांचे लाँच/वितरण केले आहे. ग्राहकांना समाधान मिळवून देण्यावर आमचा प्रमुख भर असतो. त्यासाठी ग्राहकांच्या आवडीनिवडी व गरजा जाणून घेत प्रकल्पाच्या नियोजनात त्याचा समावेश केला जातो. प्रकल्पाची वेगाने अमलबजावणी करून ब्रँडचा अनुभव उंचावण्यास आमचे प्राधान्य असते. कंपनीने मिळवलेल्या या प्रतिष्ठेच्या मदतीने एमएमआर परिसरात ब्रँडचे स्थान आणखी बळकट करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. निवासी संकुलांचे पुनर्नूतनीकरण कोलते-पाटीलसारख्या विश्वासार्ह, एमएमआरचा दशकभराचा अनुभव असलेल्या सक्षम कंपनीसाठी लक्षणीय संधी आहे.’
एप्रिल- मे २०२३ मध्ये कंपनीने पुण्यात दोन व मुंबईत दोन मिळून एकूण चार प्रकल्पांचे संपादन केले आहे. त्यांची विकास क्षमता २.६ दशलक्ष चौरस फूट आहे, तर संभाव्य विक्री अंदाज २५०० कोटी रुपये आहे. एमएमआर येथे दोन नव्या प्रकल्पांचा समावेश झाल्यामुळे नवीन व्यवसाय विकास व्यवहारांचे एकूण मूल्य ३४५० कोटी रुपयांवर गेले आहे. कंपनी सातत्याने वेगवेगळ्या व्यावसायिक विकास व विस्तार प्रकल्पांच्या शोधात असते आणि नाविन्यपूर्ण, भांडवल- सक्षम व्यवहारांच्या माध्यमातून त्यांचे संपादन करत असते.