नव्याने भर्ती झालेल्या तरुणांना पंतप्रधानांच्या हस्ते 70 हजाराहून अधिक नियुक्तीपत्रांचे वितरण

Date:

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर तसेच नागपूर येथे झालेल्या मेळाव्यांमध्ये राज्यातील तरुणांना केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप

मुंबई 22 जुलै 2023

केंद्र सरकारचे विविध विभाग तसेच संस्थांमध्ये नव्याने भर्ती झालेल्या तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 70 हजाराहून अधिक नियुक्तीपत्रांचे वितरण केले. यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला पंतप्रधानांनी संबोधित देखील केले. रोजगार मेळाव्यांच्या आयोजनाची ही सातवी फेरी आहे.

देशभरात 44 ठिकाणी आज अशाच प्रकारचे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून तेथे उपस्थित केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप केले जात आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे तसेच नागपूर या शहरांमध्ये हे मेळावे आयोजित करण्यात आले.

मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या सभागृहात आज झालेल्या  रोजगार मेळाव्यात केंद्रीय महिला आणि बालविकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती झुबीन इराणी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात 25 तरुणांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली तर विभाग प्रमुखांच्या हस्ते 74 तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. 267 उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने नियुक्तीपत्रे पाठवण्यात आली. मुंबईतल्या सीमा  शुल्क विभाग, सीजीएसटी विभाग, केंद्रीय जल आयोग, ईपीएफओ, नौदल, भारतीय टपाल विभाग, बँक ऑफ इंडिया तसेच भारतीय अन्न महामंडळ यांमध्ये देशभरातील विविध राज्यांतून निवडण्यात आलेल्या 342 उमेदवारांना  सामावून घेण्यात आले. यावेळी नवनियुक्त उमेदवारांचे अभिनंदन केंद्रीय मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःला जनतेचा प्रधान सेवक असे संबोधत देशसेवेचे कार्य करत तुम्हाला देखील देशसेवेची संधी उपलब्ध करून दिली आहे असे केंद्रीय मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी यावेळी बोलतांना सांगितलं. 140  कोटी लोकसंख्येच्या या देशात नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळणे हा तुम्ही तुमचा सन्मान समजला पाहिजे असे त्यांनी नवनियुक्त तरुणांना सांगितले. तुम्हां सर्वांना मिळालेली ही संधी केवळ गणवेषापुरती मर्यादित नसून व्यक्तिगत तसेच सामुहिक आकांक्षांचा आविष्कार करणारी ही एक सेवा आहे असे त्या म्हणाल्या. आज तुमच्यापैकी प्रत्येकजण हा संविधानाला जबाबदार असलेला प्रतिनिधी आहे आणि तुम्ही लोकशाही आणि प्रशासन यांच्याप्रती सामान्य लोकांचा आशावाद जिवंत ठेवावा ही अतिरिक्त जबाबदारी घटनेने आज तुमच्यावर टाकली आहे असे यावेळी नियुक्तीपत्रे मिळालेल्या तरुणांना उद्देशून त्या म्हणाल्या. सीमा शुल्क विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त प्रमोदकुमार अग्रवाल आणि प्रधान आयुक्त सुनील जैन यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

मुंबईमध्ये, मुंबई शेअर बाजार येथे आयोजित करण्यात आलेल्या आणखी एका रोजगार मेळाव्यामध्ये केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की आता देशात पारदर्शकतेला आणि उत्तम प्रशासनाला महत्त्व देणारे सरकार आहे, अशा वेळी सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रवेश करणाऱ्या तरुणांना देश उभारणीची मोठी संधी मिळालेली आहे. आतापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून टपाल विभागात 68 हजारांहून अधिक तरुणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी प्रधान मुख्य आयकर आयुक्त गीता रविचंद्रन यांनी देखील उपस्थित उमेदवारांना संबोधित केले. आगामी 25 वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत निर्माणाचे स्वप्न साकार करण्यात या सरकारी कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असे त्या म्हणाल्या.

पुण्यातील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय विकास प्रबोधिनी अर्थात यशदा येथे आज पार पडलेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एकंदर 198 जणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. हे उमेदवार केंद्रीय सीमाशुल्क, वस्तू आणि सेवा कर, सीमा रस्ते, हिंदुस्तान पेट्रोलियम, रेल्वे, बँका, टपाल, संरक्षण मंत्रालय, इत्यादी विविध विभागांमध्ये रुजू होणार आहेत. भारताच्या सर्वंकष विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन काम करण्याचे आवाहन यावेळी डॉ. भारती पवार यानी उपस्थित तरुणांना केले. जागतिक पातळीवरील स्पर्धात्मक वातावरणात मिळालेल्या या सरकारी नोकरीचा उपयोग केवळ स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी न करता आपले गाव, शहर, जिल्हा, राज्य आणि अखेरीस देशासाठी कसा करता येईल यादृष्टीने विचार करून कर्तव्य बजावण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित तरुणांना केले. नोकरी करताना देखील शिकण्याची जिद्द कायम ठेवून आणि आपल्यातील संशोधनाची वृत्ती जागरूक ठेवून बदलत्या भारताच्या विकास प्रक्रियेत आपले मोलाचे योगदान देण्याचा सल्ला त्यांनी दिला.

नागपूर येथे आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तरुणांना नियुक्तीपत्रे वितरीत केली. याप्रसंगी उपस्थित उमेदवारांना संबोधित करताना ते म्हणाले की युवकांनी शासकीय सेवा बजावताना पारदर्शकता, संवेदनशीलता, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, कालबद्ध निर्णय प्रक्रिया या गोष्टी लक्षात ठेवाव्या. नागपूर येथील धरमपेठच्या  वनामती सभागृहात झालेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. केंद्र सरकारमध्ये लालफितीच्या जाळ्यात अडकलेल्या पदभरती प्रक्रियेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विभागांनी मुक्त करून प्रलंबित भर्तीचे काम युद्ध स्तरावर पूर्ण करण्याचे ठरवले आहे, असे गडकरींनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजी नगर येथील आयसीएआय भवन येथे आयोजित रोजगार मेळाव्यात केंद्रीय  रेल्वे, कोळसा आणि खाण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते 25 उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. एकूण 125 उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. आयकर विभागाच्या नाशिक विभागाचे मुख्य आयुक्त राहुल करणा यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

***

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...