१५०० विद्यार्थ्यांनी केले राज्यगीताचे समूहगान आणि लाठी काठीसह साहसी खेळ सादर

Date:

पुणे : जय भवानी जय शिवाजी चा जयघोष… ढोल ताशा ंचा गजर… लाठी काठींचे मर्दानी खेळ… विद्यार्थ्यांच्या हातांमध्ये फडकणारे भगवे झेंडे अशा उत्साहपूर्ण वातावरणात बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन कार्यरत असणाऱ्या श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी तब्बल १५०० विद्यार्थी पांरपारिक वेशात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचे समुहगान केले.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, रवींद्र धंगेकर, श्री शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियमक मंडळ अधयक्ष सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष पद्माकर पवार, कमलताई व्यवहारे, बाळासाहेब गायकवाड, माधव पवार, शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे,आणि सर्व सन्माननीय मान्यवर, शाखाप्रमुख उपस्थित होते.  

शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा सोसायटीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली.

श्री शिवाजी मराठा सोसायटी – बाजीराव रस्त्यामार्गे चितळे बंधू मिठाईवाले – महात्मा फुले मंडई – शिवाजी रोड मार्गे पुन्हा श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये मिरवणूकीचा समारोप झाला.

जिजाऊ आणि बाल शिवरायाची मूर्ती असलेला फुलांनी सजलेला रथ मिरवणूकीत सहभागी झाला होता. मिरवणुकीत जयंत नगरकर यांचा नगारा, शिवगर्जना पथकाचे ढोल ताशा वादन आणि न्यू गंधर्व बँडने वादन केले. श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या सर्व शाखांचे विद्यार्थी आणि शिक्षक मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी पर्यावरण जागृती, राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छ भारत संदेश विद्यार्थ्यांनी मिरवणूकीत दिला.

अण्णा थोरात म्हणाले, श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी साहसी खेळ सादर केले. शिवरायांचे नेतृत्वगुण, त्यांचे शौर्य स्वराज्यासाठी त्यांनी केलेले कार्य विद्यार्थ्यांना कळावे आणि त्यांनी ते अंगिकारावे यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आरक्षण उप वर्गीकरणाला परिषदेचा विरोध – ॲड. जयदेव गायकवाड

वर्गीकरणाच्या नावाखाली वाद निर्माण केले जात आहेत - ॲड....

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता, भरतीला गती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत डॉ. नीलम गोऱ्हेंची यांची जोरदार मागणी

एमपीएससीने विद्यार्थ्यांशी थेट संवादाबरोबरच वेळबद्ध भरती, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया...

गृहसंस्थांच्या पातळीवर सहकाराची तत्वे रूजवणे आवश्यक–विद्याधर अनास्कर

पुणे, दि.२९: सहकाराचे अनेक पैलू आहेत. सहकारी गृहसंस्था आणि...

अल्पवयीन मुलाने ५५ वर्षीय दुचाकीस्वाराला लुटले; सेव्हन लव्हज चौक :रात्री साडेदहा वाजता …

पुणे | प्रतिनिधी खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ५५ वर्षीय...