मुंबई-भाजप नेते तथा माजी खासदार यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओवरून किरीट सोमय्या विशेषतः भाजपवर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे. या प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटलेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारकडे, किरीट सोमय्यांवर सूमोटोअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, महिलांना सूमोटो अंतर्गत संरक्षण देणार आहात की नाही?,असा सवाल राज्य सरकारला केला आहे. ज्या वृत्तवाहिनींने किरीट सोमय्यांचाय पर्दाफाश केला, त्या पत्रकरांना आणि वृत्तवाहिन्यांला संरक्षण देणार का? की, बीबीसीवर जशी अरेरावी केली. तशी धाड टाकून जो मुळ मुद्दला बगल देणार का? महिलांना ब्लॅकमेल करण्याचा मुद्दा सरकार लवून टाकणार आहे का? आता करी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर कडक कारवाई करण्याची गरज आहे आणि ते कारवाई करणार आहे की नाही करणार?, असा सवाल केला आहे.
पत्रकारांच्या प्रश्नावर यशोमती ठाकूर म्हणाल्या, महिला तक्रार करत नाही, महिलांच्या तक्रारीची गरज नाही, सरकार सूमोटो अंतर्गत कारवाई करू शकत नाही का? सरकारला हे दिसत नाही का? महिलांचे संरक्षण करणे हे सरकारचे काम नाही का? कोणती महिला घाबरत असेल किंवा ज्या महिला तक्रार करतील, त्यांना सरकार संरक्षण देणार का? हा विषय खूप गंभीर आहे. यावर गंभीर्याने कारवाई झाली पाहिजे.