पुणे येथे धाराशिव फाऊंडेशनचे उद्घाटन संपन्न
पुणे (ता.१०): ‘ सद्या राज्यासह देशातील राजकारणाने अतिशय खालची पातळी गाठली आहे. ईडी,सीबीआय सारख्या सरकारी यंत्रणांचा वापर करून आणि धमकावून विरोधी पक्षातील आमदार खासदार फोडण्याचे काम सुरू याचे उत्तर जनता मतदानातून देईल.जे लोक राजकारण जगले ,राजकारणात वाढले ते आता कसे वागले ते आपण पाहिले.हा प्रकार म्हणजे राजकीय आणीबाणी नाही तर काय आहे ? ‘ असा सवाल धाराशिव लोकसभा मतदार संघाचे ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजनिंबाळकर यांनी उपस्थित केला.पुणे येथे धाराशिव फाऊंडेशनचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला यावेळी ते बोलत होते.
१९७२ च्या दुष्काळानंतर मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातून नागरिकांचे स्थलांतर पश्चिम महाराष्ट्रात म्हणजेच पुणे,पिंपरी-चिंचवड आदी ठिकाणी झाले.गावाकडे अपुऱ्या पावसामुळे व उद्योग व्यवसाय नसल्याने उपजीविकेसाठी कामानिमित्त तसेच शिक्षणासाठी पुण्यासारख्या ठिकाणी आपली जन्मभूमी सोडून कर्मभूमी मध्ये नाव कमवत असलेल्या नागरिकांना एकमेकांशी संपर्क करता यावा यासाठी धाराशिव फाउंडेशनची स्थापना करत असल्याचे ठाकरे गटाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी यावेळी सांगितले.
फाउंडेशनच्या माध्यमातून तरुणांना शिक्षणासाठी मदत,राहण्यासाठी होस्टेल, विविध आयटी व खाजगी कंपनी मध्ये नोकरीची संधी खाजगी व सरकारी रुग्णालयास लागणारी मदत, गावाकडील कुठल्याही शासकीय कामांसाठी लागणारी कागदपत्रे मदत विविध विषयांवर मार्गदर्शने आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.
कार्यक्रमास,ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, अभिनेते उमेश जगताप, रोहित कोकाटे, माजी पोलीस आयुक्त विठ्ठल जाधव, स्टरलिन जनरेटर कंपनीचे ceo संजय जाधव, धाराशिव पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष महेश पोतदार,व्यंगचित्रकार धनराज गरड, आकाशवाणी उस्मानाबादचे निवेदक दौलत निपाणीकर, माजी उप नगराध्यक्ष जयंत पाटील, शिक्षक संघटनेचे विक्रम पाटील, राहुल गवळी, केदार साळुंखे, पंकज पाटील, चेतन वाटवडे, आतिश पाटील,
कुलदीप आंबेकर, नारायण चापके, संजय जाधव ,प्रदीप तांबे,ॲड संतोष शिंदे , प्रवीण गवळी ,अमोल वरवणे आदी मान्यवर उपस्थित होते.