पुणे: ASICS या अग्रगण्य जपानी स्पोर्ट्स परफॉर्मन्स ब्रँडने बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरची ASICS इंडियाची नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. या सहयोगासह ASICS इंडिया स्वस्थ मन स्वस्थ शरीर (साउंड माइंड, साउंड बॉडी) या आपल्या तत्त्वज्ञानाला बळकट करत आहे आणि फिटनेस उत्साही भारतीय महिलांमध्ये एक मजबूत ब्रँड प्रतिमा निर्माण करत आहे. अभिनेत्री ब्रँडच्या फुटवेअर आणि महिला स्पोर्ट्सवेअर विभागाची प्रसिद्धी करतानाही दिसणार आहे.
या सहयोगातून स्टाईल आणि आराम यांच्याशी तडजोड होणार नाही याची खात्री करून घेत ASICS इंडिया संतुलित आणि सक्रिय जीवनशैलीला चालना देण्यासाठी सामायिक दृष्टीकोनातून आपले बाजारपेठीय स्थान मजबूत करत आहे. समृद्ध वारसा आणि नाविन्यपूर्णते बद्दलची बांधिलकी यासाठी ओळखली जाणारी ASICS जगभरातील खेळाडू आणि फिटनेस प्रेमी यांच्या गरजा पूर्ण करणारी उच्च दर्जाची उत्पादने सातत्याने वितरित करत आहे.
एक अभिनेत्री म्हणून श्रद्धा कपूरचे अष्टपैलुत्व ASICS इंडियाच्या मन आणि शरीर या दोनहीचे पोषण करण्याच्या मूळ तत्त्वज्ञानाला पूर्णपणे पूरक आहे. त्यामुळे ती ब्रँडसाठी एक आदर्श आहे.
या सहयोगाबाबत भाष्य करताना ASICS भारत आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक रजत खुराना म्हणाले, “ASICS इंडियाचा नवीन चेहरा म्हणून श्रद्धा कपूरचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. तिची मनमोहक कामगिरी आणि फिटनेस राखण्याविषयीचे अतुलनीय समर्पण आमच्या ब्रँडच्या आदर्शांशी पूर्णपणे जुळते. मोठा चाहता वर्ग आणि प्रभावी व्यक्तिमत्व असलेली श्रद्धा कपूर मन आणि शरीर निरोगी राखण्याच्या महत्त्वाबद्दल लोकांना प्रेरित आणि शिक्षित करण्यासाठी एक आदर्श अॅम्बेसेडर आहे. हा सहयोग आमच्या ब्रँडचे आकर्षण उंचावेल आणि समग्र आणि सक्रिय जीवनशैलीला चालना देत संपूर्ण देशभरात आमची पोहोच वाढवेल.”
या सहयोगाबद्दल बोलताना आघाडीची बॉलीवूड सेलिब्रिटी श्रद्धा कपूर म्हणाली, “ASICS इंडियासह या भारावून टाकणाऱ्या प्रवासाला सुरुवात करण्यास मी उत्सुक आहे. शारीरिक आणि भावनिक आरोग्याच्या महत्त्वाविषयी वाढत्या जागरूकतेमुळे प्रत्येकासाठी आपल्या एकूणच आरोग्याकडे प्राधान्य देणे आवश्यक झाले आहे. माझा ठाम विश्वास आहे की निरोगी शरीर निरोगी मनाचे पोषण करते आणि ही मूल्ये माझ्या चाहत्यांसोबत शेअर करणे हे माझे नेहमीच ध्येय राहिले आहे. ASICS इंडिया ब्रँड माझ्या विश्वासाशी, समजुतीशी पूर्णपणे सुसंगत आहे. म्हणूनच ही भागीदारी जुळणारी आहे. मी या सहयोगाकडे आशेने पाहत आहे आणि टीमसोबत अद्भुत काम करत आहे.”
ASICS स्पोर्ट्सवेअर उद्योगक्षेत्रामध्ये जागतिक अग्रणी म्हणून उदयास आली आहे. आपल्या उत्पादनांच्या सादरीकरणात आराम आणि कार्यप्रदर्शन अखंडपणे एकत्र करत आहे. भारतात धावण्याविषयी प्रेम असलेला आणि आरोग्याबाबत जागरूक समुदाय सतत वाढत आहे. अशा वेळी धावपटू आणि क्रीडापटूंमध्ये पसंतीचा पर्याय बनण्याचे ASICS इंडियाचे उद्दिष्ट आहे. लोकांना आव्हानात्मक वर्कआउट्स पार पाडण्यासाठी आणि सक्रिय जीवनशैली स्वीकारण्यासाठी सक्षम बनवत भारतभर पसरलेल्या ८८ दालनांसह ASICS भारतीय ग्राहकांना उच्च दर्जाचे स्पोर्ट्सवेअर आणि पादत्राणे पुरविण्यासाठी कटिबद्ध आहे. मग ते धावणे असो, प्रशिक्षण असो किंवा रोजच्या दिवसाला वापरण्याच्या दृष्टीने सोयीचे असो, ASICS उत्पादने आराम, आधार आणि शैलीच्या अतुलनीय मिश्रणाने उठून दिसतात.
ASICS शूज आणि पोशाखांचे नवीनतम कलेक्शन मिळवण्यासाठी विमान नगर (युनिट क्र.-६० पहिला मजला, फिनिक्स मार्केट सिटी, सव्हे क्रमांक २०७, विमान नगर, पुणे- ४११०१४), डेक्कन जिमखाना (५७३/३, तळमजला, जेएम रोड, डेक्कन जिमखाना, पुणे ४११००४), परिहार चौक (युनिट क्र. एचजीएफ ०६, परिहार चौक, औंध पुणे – ४११००७), शिवाजी नगर (Asics, युनिट क्र. एफएफ-०२, पॅव्हेलियन मॉल, सेनापती बापट रोड, शिवाजी नगर, पुणे, महाराष्ट्र- ४११०१६) या चार पैकी एखाद्या ठिकाणी तुमच्या जवळच्या स्टोअरला भेट द्या.