माजी खासदार काकडे यांच्या संपर्क मोहिमेत कॉंग्रेस नेत्याचेही परिवर्तन …?
पुणे- कालपासून पुण्यातील सहा विधानसभा मतदार संघात माजी खासदार संजय काकडे यांनी प्रकाशित केलेल्या ‘मोदी@9’ या पुस्तिकेच्या वाटपाच्या निमित्ताने काकडे यांनी जोरदार संपर्क मोहीम सुरु केली आहे . या संपर्क मोहिमेत त्यांनी मॉल पासून हातगाडीवाले, हॉटेल्स , विविध दुकानदार तेथील ग्राहक यांना भेटून प्रत्यक्षात पुस्तक वाटपाचे काम सुरु ठेवले आहे. या वेळी त्यांनी कॉंग्रेस मध्ये मोठ मोठी पदे भूषविलेले अल्पसंख्यांकांचे नेते म्हणविले जाणारे पी ए इनामदार यांचीही भेट घेतली यावेळी इनामदार यांनी त्यांचे स्वागत करून पुस्तिकाच केवळ स्वीकारली नाही तर मोदी यांच्या बाबत कौतुकाचे उद्गार देखील काढले , गेल्या ५० वर्षात एवढा कार्यक्षम पंतप्रधान झालेला नाही त्यांच्या समवेतच्या अन्य नेत्यांनी , कार्यकर्त्यांनी देखील मोदींच्या क्षमतेप्रमाणे काम करणे गरजेचे आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींनी जेवढे नाव कमविले तेवढे कोणीच कमविले नाही असेही ते म्हणाले. वेगवेगळ्या भागात काकडे यांचे स्वागतही झाले अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .पहा आजच्या दुपारनंतर रात्रीपर्यंतच्या या संपर्क मोहिमेची एक झलक ….