भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
पुणे ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ प्रारंभ ‘ या एकल नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मधुरा कापशीकर आणि वेदश्री पुणतांबेकर या प्रेरणा देशपांडे यांच्या शिष्यांनी बहारदार सादरीकरण केले. हा कार्यक्रम शनीवार, २४ जून २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.
हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १६८ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.ईशान परांजपे, कृष्णा साळुंखे, यशवंत थिटे,शुभम खंडाळकर, कल्याणी गोखले यांनी साथसंगत केली.
वेदश्री पुणतांबेकर यांनी वंदने नंतर सुरुवातीला तीन ताल सादर केला. त्यात उठान, थाट, बंदिशी , तिहाई, ठुमरी ,तराणा यांचा समावेश होता. रसिकांनी चांगली दाद दिली. मधुरा कापशीकर यांनी विष्णू वंदनेने सुरवात केली.ताल झपताल दहा मात्रात सादर केला. त्यात उठान,तोडे,तिहाई, बंदिश तराणा यांचा समावेश होता. याही सादरीकरणाला भरभरून दाद मिळाली. तृषा श्रोत्री यांनी सूत्रसंचालन केले.