अभिनेता अनिल कपूरला भारतीय चित्रपटसृष्टीत ४० वर्षे पूर्ण झाल्यामुळे हृतिक रोशनने फायटरबद्दल दिली एक खास हिंट !
अनिल कपूरने भारतीय चित्रपटसृष्टीत 40 वर्षे पूर्ण केली: हृतिक रोशनने त्यांच्या आगामी चित्रपट फायटरमध्ये नेत्रदीपक कामगिरी बद्दल दिली एक खास झलक !
दिग्गज अभिनेता अनिल कपूरने काल त्याच्या गौरवशाली कारकिर्दीतील अविश्वसनीय 40 वर्ष पूर्ण केली या बद्दल त्यांनी सोशल मीडिया वर एक खास पोस्ट देखील शेयर केली. ” वो सात दिन ” या त्याच्या पहिल्या हिंदी चित्रपटातील नॉस्टॅल्जिक क्लिप शेअर करत अष्टपैलू अभिनेत्याने भारतीय चित्रपटसृष्टीत 40 उल्लेखनीय वर्षे पूर्ण केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याच्या पोस्ट मधली एक ओळ ” मी जिथे आहे तिथे हेच आहे, मला हेच करायचे आहे ” ही तुफान व्हायरल झाली !
https://www.instagram.com/p/Ct1LF92x_Bk/
काही तासा मध्ये अनिल कपूरची पोस्ट सोशल मीडिया वर व्हायरल झाली. या पोस्ट ने त्यांच्या चाहत्यांची आणि इंडस्ट्री मधल्या दिग्गजांचे लक्ष वेधून घेतलं. बॉलीवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन याने त्यांच्या या पोस्ट वर एक खास कॉमेंट केली. चित्रपटातील अनिल कपूरच्या नेत्रदीपक अभिनयाबद्दल चाहत्यांना संगाताना हृतिकने कॉमेंट मध्ये लिहिलं ” आणि तुझे सर्वोत्तम काम सतत चांगले होत आहे. तू फायटरमध्ये सर्वोत्तम आहेस!! खूप छान!!” आता ही कॉमेंट एक चर्चेचा विषय ठरली असून अनिल कपूर यांच्या आगामी फायटर बद्दल सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतील अनिल कपूरचा प्रवास अगदीच विलक्षण ठरला आहे. चार दशकांच्या कारकिर्दीत ते भारतीय चित्रपटसृष्टीचे खरे आयकॉन बनले आहेत. द नाईट मॅनेजर पार्ट 2, अॅनिमल आणि फायटर यासह त्याच्या आगामी प्रकल्पांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असताना अनिल कपूर त्याच्या अतुलनीय कार्याने अनेक अभिनेत्याने प्रेरित करत आहेत.