पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र विषयावर कार्यशाळा संपन्न

Date:

पुणे-

पुण्यात पुढील आठवड्यात होत असलेल्या जी 20 परिषद शैक्षणिक कार्य गटाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेकविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे . त्या अंतर्गत गणेशखिंड इथल्या केंद्रीय विद्यालयात आज पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र  शिक्षण पद्धती आणि  त्यासाठीची शैक्षणिक साधने याविषयी एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . पुणे महापालिकेच्या शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाचे उपायुक्त राजीव नंदकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले . 3 ते 9 वयोगटातील मुलांच्या शिक्षणाचा पाया जेवढा मजबूत होईल तेवढी त्यावरील इमारत म्हणजे देशाचे  भविष्य उज्वल होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला . मुलांच्या जडण घडणीत पालकांचा जेवढा वाटा असतो तेवढाच सहभाग शिक्षकांचा देखील असतो याची जाणीव प्रत्येक शिक्षकाने ठेवावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले .

दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत विविध सत्रामधून तज्ज्ञांनी पायाभूत  शिक्षण पद्धती नेमकी कशी असावी . त्यासाठी वापरले जाणारे अभिनव साहित्य याविषयी मार्गदर्शन केले.

पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय आवारातील केंद्रीय प्रशालेच्या प्राचार्य संगीता गुटेन यांनी निपुण भारत अभियाांतर्गत पायाभूत साक्षरतेच्या विविध शिक्षण प्रणालीविषयी माहिती दिली . गणेशखिंड केंद्रीय विद्यालय मधील प्रा . सुरेखा नरके  , खडकी केंद्रीय विद्यालय चे प्रा. प्रबिर नाग  यांनीही संख्याशास्त्र विषयी मार्गदर्शन केले . केंद्रीय विद्यालयांच्या मुंबई विभागाच्या उपायुक्त सोना सेठ यांचेही यावेळी भाषण झाले .पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र शिकवताना केंद्रीय विद्यालयातील प्राध्यापकांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी याबद्दल त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . उपस्थित पालकांनी देखील या कार्यशाळेत मोलाचा  सहभाग घेतला .

पुण्यातील विविध केंद्रीय विद्यालयातील शिक्षक , प्राचार्य आणि पालक या कार्यशाळेला उपस्थित होते . याशिवाय विविध शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी पायाभूत शिक्षणासाठी आवश्यक विविध  साधने तयार केली असून त्यांचे प्रदर्शन यानिमित्ताने भरवण्यात आले होते . केंद्रीय विद्यालयाच्या प्राचार्य शबाना खान यांनी या कार्यशाळेचे नियोजन केले होते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नसीरुद्दीन शाह आणि जिम सर्भ यांच्या ‘मेड इन इंडिया – अ टायटन स्टोरी’ला IFFI २०२६ मध्ये सर्वोत्कृष्ट वेबसीरिजसाठी नामांकन!

टाटा समूहाच्या ‘टायटन’ ब्रँडचा प्रेरणादायी प्रवास पडद्यावर; प्रबलीन संधू...

महावितरणमध्ये २३ हजार पदांची थेट भरती? सोशल मीडियावरील जाहिराती बनावट; उमेदवारांना सावधानतेचा इशारा!

दहावी उत्तीर्णांना परीक्षा किंवा मुलाखतीशिवाय नोकरीचे आमिष; अशा जाहिरातींशी...