पुणे-पत्नीने पतीवर चाकूने वार करत निर्घृणपणे खून केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. ही घटना गहुंजे येथे रविवारी (दि. 4) दुपारी घडली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून तिला सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.त्यानंतर सोमवारी (दि. 5) दुपारी मृत पतीच्या नातेवाईकांनी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेला. आरोपी महिलेच्या आई वडिलांसह अन्य नातेवाईकांची चौकशी करून संशयित वाटल्यास त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे.
अंकिता सुरज काळभोर असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. सुरज राजेंद्र काळभोर (वय 29, रा. आकुर्डी) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी सुरज यांच्या आईने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.रविवारी सकाळी अंकिताने सुरज यांना शिरगाव येथे प्रति शिर्डी मंदिरात दर्शनासाठी नेले. तेथून तिने सूरज यांना गहुंजे येथील तिच्या वडिलांच्या शेतात फिरायला नेले. शेतात फिरताना सुरज बेसावध असताना अंकिताने त्यांच्यावर धारदार हत्याराने आणि दगडाने मारत त्यांचा खून केला असल्याचे सुरज यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.पोलिसांनी अंकिताला अटक केली. तिला न्यायालयात हजर केले (Gahunje) असता न्यायलयाने तिला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.