बहु-प्रतिभावान अभिनेत्री सनी लिओनी तिच्या नवीन आणि प्रशंसित अनुराग कश्यप दिग्दर्शित केनेडी या चित्रपटाने कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. या चित्रपटाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
केनेडी हा असा एक चित्रपट आहे ज्यात सनी लिओनीने तिच्या अनेक भूमिका पलिकडे जाऊन ही भूमिका साकारली आहे. कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये या चित्रपटाचं स्क्रिनिंग नुकतंच पार पडलं आणि या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली. या चित्रपटाने प्रेक्षकांचं स्टँडिंग ओव्हेशन मिळवले आणि हाच खास क्षण सनी साठी अनोखा सोहळा होता.
अभिमानाने आनंद व्यक्त करत सनी लिओनी, दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि सह-कलाकार राहुल भट यांच्या सोबत कान्समध्ये खास फोटो पोझ दिली.
कान्समध्ये चित्रपटाच्या उत्तुंग यशाने भारतीय प्रेक्षकांमध्ये या चित्रपटासाठी खूप उत्सुकता आहे. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांकडून मिळालेली जागतिक प्रशंसा आणि जबरदस्त प्रतिसाद यामुळे उत्साह वाढला आहे, ज्यामुळे देशभरातील चाहत्यांसाठी एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव मिळेल.
केनेडी हा असा एक चित्रपट आहे ज्यात सनीच्या अभिनयाची अनोखी झलक बघायला मिळणार आहे. आकर्षक कथा आणि उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. भारतीय प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे चाहते सनी लिओनी ला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
कान्स येथे केनेडीचे अनोखं कौतुक झालं आहे. सनी लिओनीच्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे ज्यामुळे एक अष्टपैलू आणि कुशल कलाकार म्हणून तिने स्वतः ची वेगळी ओळख संपादन करत अनुराग कश्यप यांच्या सोबत चित्रपट करण्याची संधी सनीला मिळाली आणि या चित्रपटाला सगळ्यांचं प्रेम मिळालं.