एसबीए कप बॅडमिंटन स्पर्धा- सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आयोजन
पुणे: अदिती काळे हिने सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आणि पीडीएमबीएच्या सहकार्याने आयोजित योनेक्स-सनराईझ एसबीए कप कॉर्पोरेट बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळवला. तिने महिला एकेरी आणि मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
शिवाजीनगर येथील पीडीएमबीए मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा झाली. सुधांशू मेडसीकर, होस्टरोयलचे संस्थापक साकेत काळे, ऑल थिंग्ज फिजियोच्या संस्थापिका तेजस्विनी वसवे, रसल नेस्टचे संस्थापक सागर हिरे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अदितीने अदिती रोडेला १५-५, १५-३ असे सहज पराभूत केले आणि जेतेपद पटकावले. यानंतर मिश्र दुहेरीत अदितीने ऋतुराज देशपांडेच्या साथीने बाजी मारली. अंतिम फेरीत अदिती-ऋतुराज जोडीने अद्वैत साठे – प्रचिती वालापुरे जोडीला १५-१०, १६-१४ असे नमविले. अदितीला महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिचा तिहेरी मुकुट हुकला. प्रचिती वेलापुरे – उन्नती मुनोत जोडीने अदिती काळे-राधिनी भामेरे जोडीवर १५-१० १५-४ अशी मात करून जेतेपद निश्चित केले.
लोकेशला जेतेपद पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत लोकेश जुंगडने अथर्व घाणेकरला १६-१४ १०-१५ १८-१६ असे नमविले आणि विजेतेपद पटकावले. ही लढत ४२ मिनिटे चालली.
निकाल – अंतिम फेरी –३० वर्षांवरील पुरुष एकेरी – सुशांत पाटील वि. वि. ओंकार केळकर १५-११,१५-११. ३५ वर्षांवरील पुरुष एकेरी – अक्षय गद्रे वि. वि. आनंद साबू १५-८, १४-१६, १५-११.
४० वर्षांवरील पुरुष एकेरी – दिगांत गुप्ता वि. वि. सारंग व्यास १३-१५, १५-५, १५-९.५० वर्षांवरील पुरुष एकेरी – रवी कोळगे वि. वि. एस. कुमार १५-१२, १५-७.
पुरुष दुहेरी – अनिकेत बंडगर – नरेंद्र गोगावले वि. वि. मिहीर रतनजांकर – रोहन जाधव १५-१२, १५-१०.
३० वर्षांवरील पुरुष दुहेरी – अजित उमराणी – हरजितसिंग वि. वि. सचिन मानकर – तुषार बलापुरे १५-१०, १५-१०.
३५ वर्षांवरील पुरुष दुहेरी – अक्षय गद्रे – विनीत दबक वि. वि. सचिन मानकर – स्वप्नील मालपाठक ७-१५, १५-१२, १५-६.
४० वर्षांवरील पुरुष दुहेरी – स्वप्नील मालपाठक – विनीत दबक वि. वि. आनंद अय्यर – दिनेश गोपानी १५-१२, १५-७.
५० वर्षांवरील पुरुष दुहेरी – केदार टांकसाळे – रवी कोळगे वि. वि. नागेश पालकर – विवेक जबडे १५-११, १५-५.
अदिती काळेला दुहेरी मुकुट
Date: