*’कवितेस कारण की..’ कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद !
भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘आरपार’ प्रस्तुत ‘कवितेस कारण की..’ या कार्यक्रमाला तरुणाईचा भरभरून प्रतिसाद मिळाला !
‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला..या कार्यक्रमात जयेश पवार,नैनेश तांबे,भैरवी चितळे,सारंग पांपटवार,अपूर्व राजपूत यांनी कवितांचे, गझलांचे प्रभावी सादरीकरण केले. कवितांच्या या सादरीकरणाला रसिकांनी मोठी गर्दी केली होती.
“एखादी जखम पुरेशी असते , कवितेसाठी कविता नसते, नुसती शब्दांची दाटी “
असे सांगत कविता,गजल, गप्पांची ही बहारदार मैफल उत्तरोत्तर रंगत गेली
“आज ऐकायला फक्त आहेस तू, गोष्ट ऐकायला फक्त आहेस तू,नजर लावायला जग उभे राहिले,नजर काढायला फक्त आहेस तू !
अशा आर्त आणि सार्थ कवितांना भरभरून दाद मिळाली.
मला बघायची आहे , तुझ्या डोळयातली दरी,काजळाने माखलेली !
अशी सादही या कवींनी घातली.
या कैदेतून सुटका नाही, विचार कर या मिठीत येण्याआधी, लिहिली जाते कहाणी आपली दोनच भागामध्ये , मला भेटल्यानंतर, मला भेटण्याआधी “
अशा ओळीही दाद मिळवून गेल्या.