शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी चा पुढाकार ; महाराष्ट्र शाहीर साबळे यांना १०० बाल व युवा शाहिरांची गीत सादरीकरणातून मानवंदना ; महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजन
पुणे : जय जय महाराष्ट्र माझा… या गीताचे स्वर दुमदुमले आणि जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी असा एकच जयघोष झाला. तब्बल १०० बाल व युवा शाहिरांनी पारंपरिक वेशात भगवे फेटे परिधान करुन महाराष्ट्र गीत सादरीकरण करीत पद्मश्री महाराष्ट्र शाहीर साबळे यांना अनोखी मानवंदना दिली. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शाहिर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिकेजवळील मंगला थिएटर प्रांगणात आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांच्या सोबत प्रबोधिनीच्या पोवाडे वर्गातील १०० विद्यार्थ्यांनी गीत सादरीकरण केले. यामध्ये प्रा.संगीता मावळे, होनराज मावळे यांसह प्रबोधिनीतील सेवाव्रतींनी त्यांना साथ देत समूहगीत सादर केले.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेतील ज्येष्ठ नाव म्हणजे पद्मश्री महाराष्ट्र शाहीर साबळे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचे सादरीकरण देखील होत आहे. त्यानिमित्ताने प्रबोधिनीतर्फे १०० शाहिरांनी महाराष्ट्र गीत सादरीकरण करुन त्यांना मानवंदना दिली. शाहीर साबळे यांनी आपल्या आवाजातून हे गीत अजरामर केले आहे. गीत सादरीकरण झाल्यानंतर सर्वांना हा चित्रपट देखील दाखविण्यात आला.
आसमंतात दुमदुमले वैभवशाली महाराष्ट्र गीताचे स्वर
Date: