पुणे, दि. २८ एप्रिल २०२३: महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत वीजग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचच्या (सीजीआरएफ) अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. सुहास फडके यांनी नुकताच स्वीकारला आहे.
श्री. सुहास फडके हे बारामती परिमंडल अंतर्गत वीजग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे रिक्त असलेल्या पुणे येथील अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. श्री. फडके हे महाराष्ट्र शासनाच्या विद्युत विभागात विद्युत निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.