पुणे- आज निवडणूक कार्यालयात उमेदवाऱ्यांच्या अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली. कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी एकूण २९ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी २१ अर्ज मंजूर झाले आहेत. 13 अपक्षांसह 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारी माघारीची मुदत शुक्रवारपर्यंत आहे.
अर्ज वैध झालेल्या उमेदवारांची नावे:-
रवींद्र धंगेकर – महाविकास आघाडी हेमंत रासने – भाजप
अविनाश मोहिते – संभाजी ब्रिगेड पार्टी
किरण कद्रे – आम आदमी पार्टी
तुकाराम डफळ – सैनिक समाज पार्टी
बलजितसिंग कोचर – प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी
मिलिंद कांबळे – अखिल भारतीय सेना
रवींद्र वेदपाठक – राष्ट्रीय मराठा पार्टी
अपक्ष उमेदवार:
अजित इंगळे
अनिल हतागले
अभिजीत बिचुकले
अमोल तुजारे
आनंद दवे
खिसाल जाफरी
चंद्रकांत मोटे
बाळासाहेब दाभेकर
रियाज सय्यद
सलीम सय्यद
सुरेशकुमार ओसवाल
संतोष चौधरी
हुसेन शेख
अर्ज अवैध (बाद) झालेल्या उमेदवारी अर्जांची माहिती –
- गणेश मुधकर बिडकर(भाजपचे मुख्य उमेदवार पात्र झाल्याने बदली उमेदवार अपात्र)
- महेश दशरथ म्हस्के (अपक्ष – दुरुस्त प्रतिज्ञापत्र मुदतीत सादर केले नाही)
- बढाई गणेश सिताराम(अपक्ष – दुरुस्त प्रतिज्ञपत्र मुदतीत सादर केले नाही)
- बाळासाहेब राघोबा दाभेकर (इंडियन नॅशनल कँग्रेस – एबी फॉर्म नाही)
- विशाल माधव नगरारे (अपक्ष – दुरुस्त प्रतिज्ञपत्र मुदतीत सादर केले नाही)
- इम्तियाज महमद हानिफ तांबोळी (अपक्ष – दुरुस्त प्रतिज्ञपत्र मुदतीत सादर केले नाही)
- सचिन दत्तात्रय धनकुडे (अपक्ष – दुरुस्त प्रतिज्ञपत्र मुदतीत सादर केले नाही)
- इम्रान अन्वर शेख (अपक्ष – दुरुस्त प्रतिज्ञपत्र मुदतीत सादर केले नाही)
- अपर्णा विकास साठे (अपक्ष – दुरुस्त प्रतिज्ञपत्र मुदतीत सादर केले नाही)
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या ४० उमेदवारांपैकी ३३ उमेदवारांची उमेदवारी वैध ठरली आहे. आम आदमी पार्टीचे (आप) मनोहर पाटील यांच्यासह सात उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.पाटील यांनी उमेदवारी अर्ज अपूर्ण भरला; तसेच एबी अर्जापैकी बी अर्ज अपूर्ण भरल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे.भाजपच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप यांचा अर्ज वैध ठरला असून बदली उमेदवार (डमी) शंकर जगताप यांची उमेदवारी अवैध ठरली आहे. (मुख्य उमेदवार पात्र असल्याने बदली उमेदवारी अवैध) राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल (नाना) काटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलेले राहुल कलाटे यांचे अर्ज वैध ठरले आहेत. इतर राजकीय पक्षांपैकी बहुजन भारत पार्टीचे तुषार लोंढे, संभाजी ब्रिगेडचे प्रविण कदम यांसह इतर २६ अपक्षांचे अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी माघारीची मुदत शुक्रवारपर्यंत आहे.चिंचवड पोटनिवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाननी प्रक्रिया बुधवारी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी वैध, अवैध उमेदवारी अर्जांची घोषणा या वेळी केली. निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण, निवडणूक पोलीस निरीक्षक अनिल यादव यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या छाननी प्रक्रियेवेळी उमेदवारी अर्ज दाखल करणारे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
चिंचवड पोटनिवडणूक उमेदवारी अर्जांचा आढावा
एकूण उमेदवार ४०
वैध उमेदवार ३३
अवैध उमेदवार ७
राष्ट्रीयकृत पक्षांच्या उमेदवारांची संख्या २
नोंदणीकृत पक्षांचे उमेदवार ५
अपक्ष उमेदवार २६