सिनेमॅटोग्राफ कायद्यामध्ये सुधारणा केली जात आहे: माहिती आणि प्रसारण सचीव अपूर्व चंद्रा

Date:


मुंबई-भारतीय आशयाला (कंटेंट ) आज जागतिक स्तरावर अधिक स्वीकृती मिळण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे तो जास्तीतजास्त भाषांमध्ये अनुवादित करून प्रसारित  केला जात आहे आणि ओटीटी (OTT) व्यासपीठामुळे हे शक्य झाले आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज मुंबईत सांगितले. ‘भारताला जागतिक आशय आणि तंत्रज्ञानाचे केंद्र बनवण्याची धोरणे’ या विषयावर, आशिया व्हिडिओ इंडस्ट्री असोसिएशन (एव्हीआयए) चे मुख्य कार्यकारी धोरण अधिकारी क्लेअर ब्लूमफिल्ड यांच्याबरोबरच्या प्रमुख संभाषण सत्रात, माहिती आणि प्रसारण सचिव म्हणाले, “भारतामध्ये आशयाची गुणवत्ता नेहमीच चांगली राहिली आहे, मात्र आज भारतीय आशयाला जगभरात प्रवास करणे सोपे झाले आहे. यामध्ये ओटीटी ने मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. भारताबद्दलची लोकांची उत्सुकताही वाढली आहे, लोकांना भारताबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे.”

ओटीटी व्यासपीठ: काल सुसंगतता आणि नियमन

पारंपरिक प्रसारण माध्यम हे माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचा गाभा आणि कणा राहिले असले तरी, आता ओटीटी व्यासपीठ देखील एक अतिशय महत्त्वाचा घटक बनले आहे,असे  सांगत माहिती आणि प्रसारण सचिव पुढे म्हणाले की , “परंतु मला असे आढळून आले आहे की अनेक पारंपरिक मीडिया हाऊस (माध्यम संस्था) देखील आपला आशय, स्वत:च्या ओटीटी व्यासपीठावरून प्रसारित करत आहेत. आणि वेळेचे बंधन नसणे आणि स्वतःच्या गतीने एखादा आशय पाहणे, ही गोष्ट  ग्राहकांसाठी नेहमीच सोयीची असते. तर, मला वाटते, की हे नाते प्रातिनिधिक आहे, आणि आशय निर्मितीची प्रक्रिया सुरूच राहणार आहे”. 

सरकारने अतिशय सॉफ्ट-टच अर्थात  सौम्य नियमनाचे धोरण अंगिकारले आहे,असे  ओटीटी नियमनाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले. “आम्ही त्यामध्ये स्वयं-नियमन लागू केले असून, ती जबाबदारी उद्योगांवर टाकली आहे. हे त्रिस्तरीय नियमन  असून, ते काही वर्षांपूर्वी लागू करण्यात आले आहे. आम्हाला वाटते की हे धोरण चांगले काम करत आहे.

पहिल्या टप्प्यावर, आशयाच्या  गुणवत्तेबद्दल तक्रार प्राप्त झाली, तर संबंधित आशय निर्मात्याकडे  संबंधित कृती करण्यासाठी पाठवविला जातो. दुसऱ्या स्तरावर, या उद्योगाशी निगडीत त्रयस्थ संस्था यामध्ये हस्तक्षेप करते, आणि सर्वात शेवटी संबंधित तक्रार माहिती आणि प्रसारण मंत्रालयापर्यंत पोहोचते. मंत्रालय स्तरावर आमच्याकडे फारच कमी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत असे  सांगत, माहिती आणि प्रसारण सचिव म्हणाले, “मात्र त्याच वेळी, या सॉफ्ट-टच नियमनामुळे, काही अयोग्य आशय प्रसारित होण्याची शक्यता असते  ,यापार्श्वभूमीवर  माध्यम उद्योगाने देशाचे हित आणि संस्कृतीची योग्य जाणीव ठेवावी, अशी आमची विनंती आहे.” 

सिनेमॅटोग्राफ कायदा

माहिती आणि प्रसारण सचिवांनी सांगितले की,सिनेमॅटोग्राफ कायद्यामध्ये सुधारणा करण्याचे काम सुरु असून  हा मसूदा लवकरच संसदेत मांडण्‍यात येणार   आहे. इंटरनेटवर चित्रपट प्रसारित करण्याबाबतची तरतूद यामध्‍ये करण्यात  येत असल्याची  माहिती त्यांनी दिली. “असे झाल्यास, बौध्दिक स्वामित्व हक्काचे संरक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण पावले उचलण्‍याची गरज पडेल. यासाठी बौध्दिक स्वामित्व हक्काचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन करणारी (पायरेटेड) चित्रपट सामु्ग्री  दाखविणारी सर्व संकेतस्थळे आम्ही ब्लॉक करू शकणार आहोत . मात्र याविषयी  संसदेत कशा पद्धतीने कार्यवाही केली जाईल, हे पहावे लागणार आहे, असे ते म्हणाले . या संदर्भात, माहिती  आणि प्रसारण  सचिवांनी सांगितले की,   पायरसी विरोधात कारवाई करण्यासाठी सरकार नेहमीच वचनबद्ध आहे. “ जर तुम्ही  काही वेबसाइट्स पायरेटेड कंटेंटसाठी वापरल्या जात असल्याचं आमच्या निदर्शनास आणून दिल्यास, आम्ही त्या वेबसाइट्स ब्लॉक करण्याच्या दिशेने काम करू “.

व्यवसाय  सुलभीकरण  – भारतात चित्रीकरण  आणि निर्मितीपश्‍चात कार्य 

“प्रसारण क्षेत्रामध्‍ये  व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी, आमच्याकडे ‘अपलिंकिंग’ आणि ‘डाउनलिंकिंग’  मार्गदर्शक तत्त्वे आहेत.  आम्ही भारतात प्रसारित होणाऱ्या ब्रॉडकास्टर्सना  आणि उपग्रह  वाहिन्यांना परवानगी देतो.  ही सर्व प्रक्रिया  इलेक्ट्रॉनिक  आणि पारदर्शक आहे. आम्ही ब्रॉडकास्ट सेवा पोर्टल सेट केले आहे. आम्ही परवानगी मागण्याच्या पूर्वीच्यापद्धती कडून माहिती सादर करण्याच्या  पद्धतीपर्यंत  पोचलो आहोत.एकूणची ही  प्रक्रिया खूप सोपी झाली आहे’’,  त्यामुळे  प्रसारक  नवीन मार्गदर्शक तत्त्वांविषयी  खूप आनंदी आहेत. हेही आम्‍हाला त्यांच्याकडूनच समजले असल्याचे त्यांनी नमूद केले.

माहिती आणि प्रसारण  सचिवांनी असेही सांगितले की, एनएफडीसीचे ‘फिल्म फॅसिलिटेशन ऑफिस’ म्हणजेच  चित्रपट सुविधा कार्यालय  देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांना सुविधा देते आणि ते आता राज्य पोर्टल्सशी संरेखित केले जात आहे, त्यामुळे  हे कार्यालय केंद्र आणि राज्य सरकारच्या दोन्ही परवानग्या देण्‍यासाठी आणि चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी एकल-खिडकी  बनू शकेल.  भारतामध्‍ये  चित्रीकरणाला  प्रोत्साहन देण्यात येईल, असे  कान्स चित्रपट महोत्सवात जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.

राष्ट्रीय प्रसारण धोरण

प्रसारण  क्षेत्र आता परस्परविरोधी स्वारस्यांसह अनेक भागांमध्ये विभागले जात आहे आणि   विविध प्रसारक म्हणजेच  प्रसारमाध्यम प्रसारक , ओटीटी इ.ची वेगवेगळी यंत्रणा, नियम आणि दर आहेत.त्यामुळे राष्ट्रीय प्रसारण धोरणावर काम सुरू आहे असे सांगत माहिती प्रसारण सचिवांनी   राष्ट्रीय प्रसारण धोरणाची गरज व्यक्त केली.

भौतिक प्रसारण आता व्यवहार्य राहिलेले नाही आणि आता प्रत्येकजण  उपग्रह प्रसारण करत आहे,  “आम्ही ठरवले की, जी वारंवारिता(फ़्रिक्क़्वेन्सी)  भौतिक  प्रसारणासाठी वाटप करण्यात आली होती मात्र  अनेक वर्षांपासून ती  वापरली गेलेली नाही , ती वारंवारिता(फ़्रिक्क़्वेन्सी)   आवश्यक असल्यास दूरसंचार उद्देशांसाठी वापरली जाऊ शकते,असे माहिती आणि प्रसारण सचिवांनी सांगितले.

ॲनिमेशन , दृश्य परिणाम (व्हिज्युअल इफेक्ट्स) , गेमिंग आणि कॉमिक (एव्हीजीसी ): वृद्धिंगत होणारे क्षेत्र

एव्हीजीसी क्षेत्रात आशयघन  निर्मितीची  क्षमता प्रचंड आहे, असा पुनरुच्चार माहिती आणि प्रसारण सचिवांनी केला. एव्हीजीसी कृती गटाचा  अहवाल मंत्रालय स्तरावर स्वीकारण्यात आला असून तो मंत्रिमंडळाकडे नेण्यात येत आहे. जगभरात 300 अब्ज अमेरिकी डॉलर्स मूल्याच्या  गेमिंग उद्योगाला भारतात आशय  निर्मिती आणि नवोन्मेष वृद्धीसाठी   मोठा वाव आहे, असे ते म्हणाले. भारतात मोठ्या प्रमाणात आशय  होत आहे आणि अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स उद्योग आणि भारतात केल्या जाणाऱ्या निर्मिती पश्चात उपक्रमांना  प्रोत्साहन दिले जाईल, असेही ते म्हणाले.

मोबाईल प्रसारण

भारतीय घरांमध्ये सुमारे 20 दशलक्ष टीव्ही असताना, मोबाईलची संख्या जवळपास 800 दशलक्ष आहे.त्यामुळे, वाढत्या मोबाईल प्रसारणामुळे  नवीन आशय निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे, असेही माहिती आणि प्रसारण सचिवांनी सांगितले.

यानंतर , माहिती आणि प्रसारण सचिव  शहरातील मोशन पिक्चर असोसिएशनच्या बैठकीत उपस्थित राहिले. चित्रपट चित्रीकरणासाठी आणि निर्मिती पश्चात कार्यासाठी आकर्षक स्थळ म्हणून भारताचा प्रचार करण्यासंदर्भात या बैठकीतील चर्चेमध्ये भर देण्यात आला. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...