नवी दिल्ली, 11 एप्रिल 2023-रेल्वे सुरक्षा दल (आर पी एफ) मध्ये उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलच्या 9000 पदांच्या भर्तीबाबत समाज माध्यमे आणि मुद्रित माध्यमांमध्ये चुकीचा संदेश प्रसारित केला जात आहे.
सर्व संबंधितांच्या मार्गदर्शनासाठी सूचित केले जाते की रेल्वे सुरक्षा दल (आर पी एफ) किंवा रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा कोणत्याही मुद्रित किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे अशी कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही.