आर्ट मॅजिकच्या वतीने बालगंधर्व कलादालन येथे आयोजन : विनामूल्य प्रवेश
पुणे : ‘आर्ट मॅजिक’ १६ वे चित्रकला प्रदर्शन दिनांक १० ते १२ एप्रिल दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे होणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार दिनांक १० एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार असून उद्घाटनाला प्रसिद्ध चित्रकार मिलिंद फडके, अभिनेत्री गायत्री जाधव, जयंत बेगमपुरे उपस्थित राहणार आहेत.
आर्ट मॅजिकच्या संस्थापिका महालक्ष्मी पवार यांनी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात प्रामुख्याने कंटेम्पररी आर्ट, न्युज पेपूर आर्ट ३ डी आर्ट या माध्यमातील तसेच या वर्षीचे आकर्षण म्हणजे डिझाईनिंगच्या विदयार्थ्यांनी केलेले अॅक्रेलिक पेंटींग, पोस्टर पेंटींग, रेझिन, एमसिल, सॉफ्ट पेस्टल,न्यूज पेपर आर्ट, चारकोल, बॉलपेन पेंटिंग, ऑईल पेटींंग तसेच ऑईल पेस्टल, पोट्रेट चित्रांचा समावेश आहे.
आर्ट मॅजिक संस्थेला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे. सकाळी १०.३० ते रात्री ८ या वेळेत पुणेकरांना विनामूल्य प्रदर्शन पाहता येणार आहे.