मुंबई- उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आज ठाण्यात मारहाण झालेल्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांची ते भेट घेणार आहेत. शिवसेनेच्या (शिंदे गट) महिला कार्यकर्त्यांनी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. या मारहाणीत रोशनी शिंदे जखमी झाल्या असून त्यांच्या उपचार सुरु आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे ठाण्याला जाणार आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित असतील. दरम्यान रोशनी शिंदे यांची तब्येत सध्या स्थिर असल्याचं कळतं.