पुणे-भारतीय जनता पार्टी वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाच्या सरचिटणीसपदी आम्रपाली पाटील यांची नियुक्ती करण्यात आली . या नियुक्तीचे पत्र भारतीय जनता पार्टीचे वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संतोष लक्ष्मणराव राजगुरू यांनी दिले .
आम्रपाली भारत पाटील या भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा परिषदेच्या पंचायत राज आघाडीच्या उपाध्यक्ष तसेच वीरांगना फाऊंडेशनचे सचिव , आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जस्टीस फेडरेशनच्या प्रदेश अध्यक्ष आदी पदावर कार्यरत आहेत . हुंडा बळी , स्त्री भृण हत्या विरोधी जनजागृती मोहिम वीरांगना फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवित आहे . त्यांना सन २०१५ मध्ये एशियन युथ पुरस्कारने सन्मानित करण्यात आले . त्या वीरांगना महिला बचत गटाच्या अध्यक्षा आहेत .
पत्र देते वेळी वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार जगदीश मुळीक , नगरसेवक योगेश मुळीक , नगरसेवक संदीप जऱ्हाड , भारतीय जनता पार्टीचे वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे सरचिटणीस ज्ञानेश्वर बाबर संतोष घोलप ,संतोष शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .
