पुणे-
शाळेची मजा -मस्तीचा अनुभव घेत २० वर्षांनी आता पालक झालेल्या विद्यार्थ्यांची नुकतीच शाळा भरली होती . वानवडीतील ह. ब. गिरमे शाळेमधील माजी विद्यार्थांचा शंकरशेट रोडवरील ग्रीन इनमध्ये १९९७ चा दहावीचा वर्ग भरण्यात आला . शाळेतील आणि बालपणाच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला . व्यवसाय आणि कामानिमित्त दूर गेलेले मित्र , मैत्रिणी पुन्हा एकत्र जमले होते . या मेळाव्याचे संयोजक विकास शितोळे व विशाल दळवी यांनी सांगितले कि , सर्वजण २० वर्षांनी एकत्र आल्याने खूप आनंदी आणि उत्साह होता . सर्वानी एकत्र येऊन सामाजिक उपक्रम करण्याचा मानस व्यक्त केला . तसेच शाळेची आठवण म्हणून एक स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले . कार्यक्रमाची शेवटी सर्वानी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला .
या मेळाव्यामध्ये विकास शितोळे , विशाल दळवी, ओम करे , अजय लोणकर , अमोल खुटवड , गणेश जांभुळकर , महेश जांभुळकर , विलास लोणकर , जयंत करजगीकर ,संजय गंडाळ , राहुल येलकर , बाळासाहेब जाधव , दत्ता पोकळे , पोपट जगताप , आरती गिरमे , स्वाती जांभुळकर , उन्नती शिनगारे , ललिता शेंडकर , मनिषा लोणकर , दया गवळी , स्वाती म्हस्के , ज्योती सांगवेकर , शिल्पा पतंगे , वंदना गायकवाड , मंजू कटके , संतोष लोणकर , महेश मंडलिक , सचिन रेड्डी सहभागी झाले होते .