पुणे-गुरु गोविंदसिंग ३५२ व्या जयंतीनिमित्त पुणे लष्कर भागातील गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथून नगर कीर्तन दरबार मिरवणूक उत्साहात संपन्न झाली . या नगर कीर्तन दरबार मिरवणुकीत मोठ्या शीख बांधव व गुरुनानक हायस्कुल व गुरुनानक पब्लिक शाळेतील विद्यार्थी जनजागृती फलक घेऊन तसेच भजन करत सहभागी झाली होती . मिरवणुकीच्या सुरुवातीला पंचपारे सहभागी झाले होते . त्यांचे स्वागत फुलांची उधळण करीत करण्यात आले . गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथून झालेली हि नगर कीर्तन दरबार मिरवणूक म्हसोबा मंदिर , लष्कर पोलीस ठाणे चौक , इंदिरा गांधी चौक , महावीर चौक , महात्मा गांधी रस्ता , अरोरा टॉवर्स , लाल देवळं , सायकल सोसायटीमार्गे गणेश पेठ येथील श्री गुरुसिंग सभा गुरुद्वारा येथे समाप्त झाली .
या मिरवणुकीत गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी , संतसिंग मोखा , हरमिंदरसिंग घई , संतोकसिंग राजपाल , नेपाल सिंग , आर. पी. एस. सहगल , बलविंदर ऑबेरॉय , कुलजितसिंग चौधरी , दविंदरसिंग चावला , दलजितसिंग रँक आदी मान्यवर व शीख बांधव सहभागी झाले होते .