पुणे -शहराची वाढती वाहतूक हि समस्या मोठी जटील झाली असून शिस्तप्रिय म्हणून ख्याती असलेल्या ख्रिस्ती समाजाने वाहतूक जनजागृतीसाठी मदत करावी . आसे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेच्या पुणे शहर पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी येथे केले .त्या ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त एम्प्रेस गार्डन येथे ख्रिस्त ऐक्य संघटतर्फे मेळावा कार्यक्रमात त्या बोलत होत्या . यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा संघटनेतर्फे सन्मान करण्यात आला . या मेळाव्यास शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत , माजी आमदार मोहन जोशी , परिमंडळ चारचे सहाय्यक आयुक्त देविदास पाटील , वानवडी विभागाचे वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र विभांडीक , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड ,फिनिक्स बहुद्देशीय संस्थेचे सचिव संभाजी बालवडकर ,व सनराईज इंटरनॅशनल स्कुलचे अध्यक्ष शरद बालवडकर आदी मान्यवर उपस्थित होते . सत्कार्थींमध्ये प्रामुख्याने दत्तवाडी येथे नुकत्याच घडलेल्या कालवा फुटीच्या घटनेत अनेकाचे प्राण वाचविणाऱ्या महिला पोलीस हवालदार नीलम गायकवाड , पेन्टथलॉन गेम २००८मध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारे अजिंक्य बालवडकर , सामाजिक कार्यकर्ते मनजितसिंग विरदी , प्रकाश पी परब , शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल २००८ मध्ये पुरस्कार प्राप्त रेखाब जे लोंढे , सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मते , नगरसेविका अश्विनी लांडगे ,माजी नगरसेवक दीपक उर्फ बाबा मिसाळ , नगरसेवक वनराज आंदेकर , राजाभाऊ चव्हाण व राष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू तनुश्री बेंगळे आदी मान्यवरांचा सन्मानचिन्ह , पुष्पगुछ व शाल देउन मान्यवर पाहुण्याच्या हस्ते सन्मान करण्यात आला .
यावेळी ख्रिस्ती समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .या मेळाव्याचे संयोजन ख्रिस्त ऐक्य संघटनेचे अध्यक्ष राजेश राठोड , उपाध्यक्ष राजन नायर , सचिव मोझेस कलकोटी , खजिनदार अनिल भालशंकर , संपर्कप्रमुख राजेंद्र शिंदे , प्रसिध्दीप्रमुख सुहास जाधव, पास्टर सुधीर चव्हाण ,ऍड रविंद्र शिंदे , सुशील बेंगळे व मनोज परदेशी आदींनी केले . प्रास्ताविक राजेश राठोड यांनी केले तर सूत्रसंचालन मोझेस कलकोटी यांनी केले तर आभार राजन नायर यांनी मानले .