पुणे-गुरुनानक फाऊंडेशनच्यावतीने ३४ वा महान कीर्तन दरबार विविध धार्मिक कार्यकमानी तीन दिवस उत्साहात संपन्न झाला . रास्ता पेठमधील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या मैदानावर गुर तेग बहादूर नगर मध्ये हा महान कीर्तन दरबार संपन्न झाला . श्री गुरु ग्रंथ साहेबांचा अखंड पाठाने सुरुवात झाली . कथा कीर्तन , गुरबानी विचार मांडण्यात आले. पहिल्या दिवशी गणेश पेठ येथील गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा येथून दारूवाला पूल , अपोलो सिनेमा , के इ एम हॉस्पिटल ,समर्थ पोलीस ठाणे , क्वार्टर गेट , सायकल सोसायटी यामार्गे प्रभात फेरी काढण्यात आली .हि प्रभात फेरी टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या मैदानावर गुर तेग बहादूर नगर मध्ये समाप्त झाली . पहिल्या दिवशी लहान मुलांचा कीर्तन दरबार झाला .यामध्ये ३०० मुले सहभागी झाले होते . यावेळी लहान मुलावर संस्कार , कविता , विविध स्पर्धा घेण्यात आल्या . यामधील विजेत्या मुलांना पारितोषिक वितरण झाले .
या महान कीर्तन दरबारमध्ये तीन दिवस हरमीत सिंग , जगतार सिंग , जुजार सिंग , महिन्दर सिंग आदींनी कीर्तनातून गुरु ग्रंथ साहेबांचे संदेश देण्यात आला . त्यानंतर आरदास म्हणन्यात आली . भारतीय सेनेतर्फे अशोक चक्र प्रधान प्राप्त व सीमेवर लढताना अभूतपूर्व कामगिरी केल्याबद्दल व शीख धर्माच्या सेवेसाठी गुरुनानक फाऊंडेशनच्यावतीने यंदाच्या वर्षी निवृत्त लेफ्टनंट कर्नल सरदार मनजितसिंग कोहली यांना ” श्री गुरुनानकदेवजी पुरस्कार ” देउन सन्मानित करण्यात आले . निवृत्त लेफ्टनंट कर्नल सरदार मनजितसिंग कोहली हे भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग कोहली यांचे धाकटे बंधू आहेत . तसेच , सरदार परविंदरसिंग भाटिया यांनी सन २००८ मध्ये नांदेड येथे झालेल्या ” ३०० साल गुरु दे नाल ” याकरिता विशेष सेवा केल्याबद्दल त्यांना ” समाजसेवक पुरस्कार ” देण्यात आला . भारतभर त्यांनी २८८ शहरात फिरून जागृती यात्रा काढून पूर्ण नानक नाम सेवा संगत याना एकत्रित केले . त्यामुळे त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला . तसेच, विशेष सामाजिक कार्याबद्दल मनजितसिंग विरदी यांचा ” विशेष सामाजिक कार्यकर्ता ” म्हणून सन्मानित करण्यात आले .
या महान कीर्तन दरबारचे आयोजन गुरुनानक फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरजितसिंग राजपाल , परमजितसिंग राजपाल , संतोकसिंग राजपाल , भोलासिंग अरोरा , रणजितसिंग अरोरा , गुरुविंदरसिंग राजपाल , बॉबी सहानी , रणजितसिंग कालडा व अन्य पदाधिकाऱ्यानी विशेष परिश्रम घेतले . या महानकीर्तन दरबारमध्ये माजी आमदार मोहन जोशी , नगरसेवक रविंद्र धंगेकर , रोहित पवार आदी मान्यवर उपस्थित होते .