दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला व्ही. बी. जी. राम जी. अंतर्गत कामांचा आढावा

Date:

सर्व विभागांना कामांचे उद्दिष्ट वाटप; जलसंधारण, पाणी पुनर्भरण आणि रोजगारनिर्मितीच्या कामांना प्राधान्य

पुणे, दि. ७: संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी तसेच ग्रामीण भागात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेऊन पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्ही. बी. जी. राम जी. अंतर्गत प्रस्तावित कामांचा आढावा घेतला. या आढाव्यादरम्यान जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांना कामांचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले असून, प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक कामांचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर पाणी उपलब्धता वाढविणे, पावसाचे पाणी अडविणे व जमिनीत जिरविणे, भूजल पातळीत वाढ करणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे, या उद्देशाने विविध प्रकारची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील १,४०५ ग्रामपंचायतींचा विचार करून विविध विभागांना कामांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभाग, मृद व जलसंधारण विभाग, वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागांचा समावेश आहे.

जलसंधारणाच्या कामांना विशेष प्राधान्य
ग्रामपंचायत स्तरावर शोषखड्डे, विहीर पुनर्भरण, नाला सरळीकरण व खोलीकरण, जलतारा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणंद रस्ते तसेच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. याशिवाय कंपार्टमेंट बंडिंग, गॅबियन स्ट्रक्चर, नाला बंडिंग, मातीनाला बांध, नाडेप आणि गांडूळ खत प्रकल्प यांसारख्या कामांचाही समावेश करण्यात आला आहे.

शोषखड्डे आणि विहीर पुनर्भरण, नाडेप व गांडूळ खत प्रकल्पांसाठी प्रत्येकी १४ हजार ५० कामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी ४ हजार २१५ कामे आणि पाणंद रस्त्यांसाठी १ हजार ४०५ कामांचे नियोजन करण्यात आले आहे.

मृद व जलसंधारण विभागाची महत्त्वाची भूमिका

मृद व जलसंधारण विभागामार्फत पाझर तलावांमधील गाळ काढणे व तलावांची दुरुस्ती, नाला सरळीकरण व खोलीकरण, दगडी बांध (Gully Plug), कंपार्टमेंट बंडिंग, गॅबियन स्ट्रक्चर, नाला बंडिंग तसेच माती नाला बांध ही कामे करण्यात येणार आहेत.

दगडी बांध, कंपार्टमेंट बंडिंग, गॅबियन स्ट्रक्चर, नाला बंडिंग आणि माती नाला बांध या प्रत्येक कामासाठी १,४०५ ग्रामपंचायतींच्या प्रमाणात प्रत्येकी दोन कामे, असे एकूण २ हजार ८१० कामांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

पाझर तलावांमधील गाळ काढणे आणि त्यांची दुरुस्ती केल्यामुळे पाणीसाठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच उपलब्ध बंधाऱ्यांच्या ठिकाणी नाल्यांचे सरळीकरण व खोलीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सामाजिक वनीकरण विभागामार्फत वैयक्तिक वृक्षलागवडीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत दोन कामे, या प्रमाणात एकूण २ हजार ८१० कामांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. रोपवाटिका उभारणीदेखील पाण्याच्या उपलब्धतेनुसार करण्यात येणार आहे.

पाणंद रस्ते व सार्वजनिक बांधकामांवर भर

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाणंद रस्ते व मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यासाठी १,४०५ कामांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शासनाकडून मंजूर झालेली सर्व कामे शेल्फवर ठेवण्याबाबतही नियोजन करण्यात आले आहे.

गावनिहाय नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी

जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक परिस्थिती, पाण्याची उपलब्धता, नैसर्गिक जलप्रवाह आणि आवश्यकतेनुसार कामांची निवड करण्यावर भर देण्यात आला आहे. विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून प्रस्तावित कामांचे नियोजन आणि अंमलबजावणी केल्यास जलसंधारणाला चालना मिळण्याबरोबरच ग्रामीण भागातील पाणीटंचाई कमी करण्यास मदत होणार आहे.

संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डुडी यांनी विविध विभागांना उद्दिष्टे निश्चित करून दिल्याने जिल्ह्यात जलसंधारण, जलस्रोत पुनरुज्जीवन, वृक्षलागवड, मृदसंधारण आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळणार आहे. या कामांच्या माध्यमातून गावागावांत पाणी अडविणे, पाणी जिरविणे आणि उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एकही लेक हुंड्याची बळी ठरणार नाही, तीच महाराष्ट्र व माझ्यासाठी खरी दिवाळी : डॉ. नीलम गोऱ्हे

पायल झांबरे यांच्या माहेरी जाऊन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी...

८० वर्षीय वडिलांच्या डोक्यात फावड्याने वार करून हत्या; कौटुंबिक वादातून मुलानेच घेतला जन्मदात्याचा जीव!

पर्वती पायथ्याच्या जनता वसाहतीतील धक्कादायक घटना; ४६ वर्षीय मुलाला...

दिवाळी पहाट मैफलीतच ख्यातनाम मृदंगवादक श्रीधर पार्थसारथी यांची प्राणज्योत मालवली; वादन करताना मंचावर कोसळले!

पुण्यातील बाणेरमध्ये हृदयविकाराचा झटका; डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न अपयशी, शंकर...