पुण्यातील युवकांनी गणेशोत्सवावर तयार केले गाणे

Date:

पुणे-गणेशोत्सव जगात पोहचविण्यासाठी पुण्यातील युवकांनी गणेशोत्सवावर गाणे
तयार केले . मांगल्यम फिल्म्सच्यावतीने ‘ आला आपला गणपती बाप्पा सुखकारक
दुःखहर्ता ‘ हे गाणे तयार केले आहे . हे गाणे आदिती द्रविड यांनी लिहले असून
गाण्याची निर्मिती मांगल्यम फिल्म्सचे डायरेक्टर प्रदीप भोसले यांनी केले असून
गीताचे प्रसिध्द कोरिओग्राफर लॉन्जनीस फर्नाडिस , गाण्याचे प्रसिध्द
सिनेमाफोटोग्राफर वीरधवल पाटील , संगीत साई पियुष यांनी दिले आहे . प्रसिद्ध
युवा गायक आदर्श शिंदे यांनी आपल्या सुमधुर आवाजात हे गीत गायले आहे . या
गाण्यामध्ये प्रसिध्द अँकर संदीप पाटील यांनी काम केले असून प्रसिध्द नृत्यकार
साहिल साह, पियुष मल्होत्रा व सुभाष डेंग यांनी अप्रतिम नृत्य केले आहे .या
गाण्यासाठी कलार्थी कथकच्या गौरी स्वकुळ यांनी विशेष सहकार्य केले . हे गाणे
सिंहगड रोडवरील नवले लॉन्समध्ये चित्रीकरण केले आहे . यासाठी नवले लॉन्सचे
संचालक विनोद वाघमले व प्रदीप नवले यांनी विशेष सहकार्य केले . हे गाणे रेड ड्रॅगन
कॅमेरावर चित्रित केले असून तीन मिनिटाचे गाणे आहे . अशी माहिती मांगल्यम

फिल्म्सचे डायरेक्टर प्रदीप भोसले यांनी दिली . या गाण्याला सोशल मीडियावर
गणेशभक्तानी प्रतिसाद दिला आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 15 हजार कोटींनी वाढला …

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तिपीठ...

भाजप राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारची धडक

पुणे-पुण्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या...

पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर तब्बल 15 तास वाहतूक ठप्प:1 गॅस टँकर पलटी

मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस...