Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

” स्मार्ट कम्युनिटी मार्केट डिझाईनच्या खुल्या कल्पना ” या स्पर्धेमध्ये लोहगाव येथील डी. वाय. पाटील वास्तूविद्या महाविद्यालय सन्मानित

Date:

पुणे- स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने आयोजित केलेल्या ” स्मार्ट कम्युनिटी मार्केट डिझाईनच्या खुल्या कल्पना ” या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ म्हणून लोहगाव येथील डी. वाय. पाटील वास्तूविद्या महाविद्यालयाचे रोहन पाबळे , अश्विनी शितोळे व अक्षय शिवरकर या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व दहा हजार रुपये रोख रक्कम देउन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्याहस्ते गौरविण्यात आले .विजेत्यांना स्मार्ट सिटीशी संलग्न असणाऱ्या स्मार्ट कम्युनिटी मार्केटच्या वास्तुरचनाकरासोबत ( आर्किटेक्ट )प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे .

यावेळी पुणे महापालिका आयुक्त सौरव राव , पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप , संचालक सुब्रमणियन पदमनाभन, पुणे महापालिका सभागृह नेते श्रीनाथ भिमाले , पुणे महापालिका विरोधी पक्षनेते चेतन तुपे , वाहतूक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे आदी मान्यवर उपस्थित होते .

स्मार्ट कम्युनिटी मार्केट्स उभारण्यास आवश्यक असणाऱ्या   डिझाईनच्या खुल्या कल्पना मांडण्यासाठी  स्पर्धा घेण्यात आली होती . त्याला पुण्यातील १५ वास्तुविद्या ( आर्किटेक्ट ) महाविद्यालयांना निमंत्रित करण्यात आले होते .त्यापैकी सात महाविद्यालयांनी त्यांचे  डिझाईन सादर केले होते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...