पुणे- इतना टूटा हू के छूने से बिखर जाऊंगा …… , हंगामा क्यू हे बरपा थोडी सी जो पी ली है …… , प्यार का पहला खत लिखने मै वक्त लगता है ……. , चढता सुरज धीरे धीरे …… , चुपके चुपके रात दिन असू बहाणा याद है ….. , कल चांदणी रात थी शब भर रहा चर्चा तेरा …एक एक गझल सदर होत गेली आणि गझलची शाम संस्मरणीय होत गेली
द मुस्लिम वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी , बजमे अ अदब , पूना कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ” शाम – ए – गझल ” हा गझलचा कार्यक्रम आयोजित केला होता . पुणे लष्कर भागातील पूना कॉलेजच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमामध्ये मुंबईचे प्रसिध्द गझल गायक रफिक शेख , पुण्याचे गझल गायक शकील इनामदार यांनी विविध गझल सादर करून गझलप्रेमींना मंत्रमुग्ध केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साबीर शेख यांनी केले .
या कार्यक्रमाचे उदघाट्न अंजुमन ए खैरुलइस्लाम पूना कॉलेजचे विश्वस्त मिर्झा सलात बेग व उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्याहस्ते करण्यात आले .या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोंढवा प्रभाग समितीचे अध्यक्ष हाजी गफूर पठाण , पूना कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. खान मोईनुद्दीन , हाजी गुलाम एज्युकेशन ट्रस्टचे माजी अध्यक्ष मुन्नावर पीरभाई , गोल्डन ज्युबली एजुकेशन ट्रस्टचे अध्यक्ष शाहिद इनामदार , प्रसिध्द कवी अस्लम चिश्ती , ऍड. सलीम शेख , बांधकाम व्यावसायिक अमिन शेख , हज कमिटीचे अध्यक्ष हाजी रियाझ काझी ,जेष्ठ पत्रकार झुल्फिकार सहेर , इकबाल शेख , रफिक काझी , सलीम बागवान , मुमताज पीरभाई , लेडी हवाबाई शाळेच्या मुख्याध्यापिका जिल्हेहुमा बारगीर , जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष शफाकत शेख , युसूफ वहिद , गोल्डन ज्युबली एजुकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष शाहिद मुनीर शेख , हाजी गुलाम एजुकेशन ट्रस्टचे विश्वस्त अब्दुल वहाब शेख , मुश्ताक अलबुशरा ,गोल्डन ज्युबली एजुकेशन ट्रस्टचे माजी अध्यक्ष एस. एम. खान , प्रसिध्द कवी नजीर फतेपुरी , शिक्षक पतसंस्थेचे संचालक व माजी अध्यक्ष भानुदास कुलाळ , आबिद अश्ररफी , हमीद बियाबानी , अझीम गुडाकूवाला , सत्तार शेख , मुबारक जमादार आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे संयोजन द मुस्लिम वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद बियाबानी , शाबीर शेख , नौशाद हुसेन यांनी केले होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहमद बागवान , मोहम्मद मुतालीब , लतीफ शेख , रफिक शेख , आरिफ शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले .