पुणे-रास्ता पेठमधील एथेल गॉर्डन अध्यापिका महाविद्यालयामध्ये विधानपरिषदेचे आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या आमदार निधीमधून सहा संगणक प्रदान करण्यात आली . या संगणक संगणक कक्षाचे उदघाटन आमदार अनंतराव गाडगीळ यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले .
यावेळी एथेल गॉर्डन अध्यापिका महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा म्हंकाळे , विल्सन मॅसी ,अनिल गडकरी , सुजया पुणेकर , गोपाळराव पायगुडे , सर्वेश्वर थोरात आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी विधानपरिषदेचे आमदार अनंतराव गाडगीळ यांनी सांगितले कि , राजीव गांधी यांनी संगणकाच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञानाची क्रांती आणली . त्या क्रांती मुळे आज आय टी उद्योगात तरुणांना रोजगार मिळाले . यासाठी आपण आपला आमदार निधीतून शैक्षणिक क्षेत्रात देत आहोत . जेणे करून आपण संगणकाचे ज्ञान प्राप्त करावे .
या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत एथेल गॉर्डन अध्यापिका महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा म्हंकाळे यांनी केले तर सूत्रसंचालन शिल्पा पंडित यांनी केले तर आभार मनिषा गडकरी यांनी मानले .