पुणे- माईर्स एमआयटी, पुणे संचलित, तळेगाव दाभाडे येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (एम.आय.एम.ई.आर.) वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयातर्फे सोमवार, दि. १० जुलै ते शनिवार, दि. १५ जुलै २०१७ या कालावधीत गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून भव्य विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिराच्या कालावधीत विविध आजारांचे निदान व सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. तसेच, सी.टी.स्कॅन (C.T.SCAN), एम.आर.आय.(MRI), यासारख्या महागड्या तपासण्या सर्वांसाठी अत्यंत सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत. रुग्णालयात दाखल होणार्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य व उपचारासाठी लागणारी औषधेही रुग्णालयातर्फे अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध केली जाणार आहेत.
या शिबिरामुळे मावळ भागातील जनतेला दर्जेदार परंतु महागड्या भासणार्या वैद्यकीय सेवा अगदी माफक खर्चात उपलब्ध होणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे मावळ येथील शहरी व विशेषकरून ग्रामीण भागातून स्वागत करण्यात येत आहे. या शिबिराचा मावळ भागातील जनतेने जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे यांनी केले आहे.