Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘माइर्स एमआयटी – स्कूल ऑफ टेलिकॉम’तर्फे ‘एनकॉर्ड’च्या ई-हेल्थकार्डचा पुरस्कार देऊन गौरव

Date:

पुणे : माइर्स एमआयटी – स्कूल ऑफ टेलिकॉम दरवर्षी नवस्थापित उद्योजकांच्या प्रयत्नांची प्रशंसा करुन त्यांचा गौरव केला जातो. यंदा हा पुरस्कार एनकॉर्डच्या ई-हेल्थकार्ड या अभिनव संकल्पनेला मिळाला असून संस्थेतर्फे एमआयटी कॅम्पसमध्ये आयोजित आयसीटी आंत्रप्रेन्युअरशिप फॉर इंडिया इम्पॅक्ट कार्यक्रमात काल तो सन्मानपूर्वक देण्यात आला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना एनकॉर्डचे संचालक प्रकाश लोहारकर म्हणाले, की आमच्या ई-हेल्थकार्डला वर्षभरात मिळत असलेला भरघोस प्रतिसाद व पाठिंबा भारावून टाकणारा आहे. या पुरस्काराच्या रुपाने आमच्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाणे सन्मानाचे आहे. निरंतर यशासाठी अभिनव विचार वाढत्या प्रमाणात गरजेचे ठरतील, हेच यातून ठळक झाले आहे.
 
एनकॉर्डने आरोग्यसुरक्षा क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीबद्दल, तसेच ई-हेल्थकार्डसारखी अभिनव संकल्पना विकसित केल्याबद्दल हा गौरव करण्यात आला आहे. हे कार्ड वापरकर्त्याला जगभर त्याच्या वैद्यकीय तपशिलासाठी एकात्मिक संपर्क पुरवते. ई-हेल्थकार्ड ही वैयक्तिक आरोग्य तपशील प्रणाली म्हणजे क्लाऊड आधारित अभिनव पेटंटप्राप्त तंत्रज्ञान असून ते एनकॉर्ड हेल्थ कार्ड एलएलपी कंपनीने HITECH, HIPAAHL7 या आंतरराष्ट्रीय मापदंडांनुसार विकसित केले आहे. हे कार्ड प्रत्येकाला लाईव्हवायर प्लॅटफॉर्मवर जागतिक आरोग्यसुरक्षा सेवा पुरवठादारांशी जोडते.
 
 हा प्लॅटफॉर्म सर्व आरोग्य माहितीचे डिजीटल रुपांतर करतो व हा तपशील, तसेच विशिष्ट आरोग्य माहितीची इलेक्ट्रॉनिक साठवण, जतन व डाऊनलोडिंग कधीही, कुठेही करु देतो. या माहितीसाठ्यात वैद्यकीय विमा, अद्ययावत आरोग्य स्थिती, रक्तगट व इतर अनेक मूल्यवर्धित सेवांचा समावेश असतो. वैद्यकीय माहितीसाठा हस्तांतराचे सुसूत्रीकरण झाल्याने निदान अचूक व वेळेवर होण्यासाठी हे अभिनव संशोधन साधारण अथवा आपत्कालीन स्थितीत एक वरदानच आहे. हे कार्ड जगभरातील आरोग्यसुरक्षा व्यावसायिक, संशोधक, रुग्णालये व रुग्णांना सेवा पुरवते. क्लाऊडच्या माध्यमातून ई-हेल्थ कार्ड कधीही व कुठेही क्सेस करता येते. वापरकर्ता मोबाईल प्लिकेशनच्या मदतीनेही वैद्यकीय तपशील क्सेस करु शकतो.
 ई-हेल्थकार्ड न्यूयॉर्कमध्ये फेब्रुवारी २०१५ मध्ये, तर पुण्यात ऑक्टोबर २०१५ मध्ये सादर करण्यात आले. भारतातील ७ महानगरांत विस्तारण्याचे त्याचे लक्ष्य आहे. विस्तारासाठी भारताबरोबरच आग्नेय आशिया, पश्चिम आशिया व आफ्रिकी देश या बाजारपेठांवर आणि न्यूयॉर्क, अंकारा आदी ३० आंतरराष्ट्रीय शहरांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या प्रत्येक भौगौलिक क्षेत्रात एनकॉर्डचे भागीदार व सक्रिय सहयोगी आहेत. एनकॉर्डस् ई-हेल्थकार्डचा समावेश सिलिकॉन रिव्ह्यू मासिकाच्या टॉप १० फास्टेस्ट ग्रोईंग हेल्थकेअर कंपन्यांच्या यादीत करण्यात आला आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याचा महापौर भारतीय जनता पार्टीचाच होणार हा विश्वास – धीरज घाटे

पुणे ता १३ ;- लोकसभा निवडणूक खासदार , विधानसभे...

धीरज घाटे हेच पुन्हा भाजपचे शहर अध्यक्ष…

पुणे :भारतीय जनता पार्टीने आज (ता.13 मे)...

पुणे विद्यार्थी गृहाचा ११६ वा वर्धापनदिन उत्साहात

कुलगुरू दादासाहेब केतकर यांना अभिवादन पुणे : गरीब व होतकरू...

धानोरी ते चऱ्होली डी. पी. रस्त्यासाठी वनविभागाची परवानगी मिळावी; आमदार बापूसाहेब पठारे यांची मागणी

सद्यस्थितीला रस्ता नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय; पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण...