परराष्ट्र मंत्रालयाचे आंतरवासिता धोरण जाहीर

Date:

मुंबई, दि. 26 : परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील सर्व राज्यांकरिता आंतरवासिता धोरण जाहीर केले आहे. अलीकडेच ऑगस्ट 2016 मध्ये मंत्रालयाच्या आंतरवासिता धोरणासंबंधी प्रकाशित नियमांचा व्यापक आढावा घेण्यात आला असून त्याचा मुख्य उद्देश म्हणजे एम ए ई वरती जास्त लक्ष केंद्रित करणे, आंतरवासितांना जास्त वाव मिळवून देणे, तसेच मंत्रालयाने आंतरवासितेसाठी (internship) निवडलेल्या उमेदवारांत पात्रता आणि या उमेदवारांमध्ये विविधता वाढवणे, लैंगिक समावेशकता निर्धारित करणे, हा आहे.

विविध मोहिमा व अभियानात आंतरवासिता करणारे तथा विदेशात कार्य करणाऱ्यांसाठी जाणाऱ्यांसाठी अस्तित्वात असलेल्या नीती धोरणांमध्ये हा आढावा घेताना कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवी घेतलेले आणि 31 डिसेंबर रोजी 25 वर्षापेक्षा कमी वय असणारे भारतीय नागरिकांसाठी एम ई ए मुख्यालयात आंतरवासिता खुली असेल.

कमाल मर्यादा आणि कालावधी

प्रत्येक वर्षी इंटर्नशिप सहा महिन्याच्या दोन सत्रांमध्ये दिली जाईल. जानेवरी ते जून आणि जुलै ते डिसेंबर असे हे सत्र असतील. प्रत्येक सत्रामध्ये या मंत्रालयामार्फत कमाल 30 आंतरवासित घेतल्या जाईल. प्रत्येक आंतरवासितांसाठी सदर कार्यक्रम तीन महिन्यांचा असेल.

विविधता

देशातील सर्व भागातल्या लोकांपर्यंत मंत्रालय आणि विदेश धोरण घेऊन जाण्याच्या उद्देशाने या आंतरवासितांमध्ये जास्तीत जास्त विविधता असावी यासाठी लक्ष दिले जाईल. यामध्ये मुख्यतः लिंग, वंचित घटक, भौगोलिक अधिवास आणि नागरी तथा ग्रामीण अशा दोन्ही भागाच्या प्रतिनिधित्वावर भर दिला जाईल. आकांक्षी जिल्हा सुधार कार्यक्रम (टी ए डी पी) जिल्हा अंतर्गत युवकांना या निवड प्रक्रियेत प्राधान्यक्रम दिला जाईल.

निवड

ही निवड प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन http://www.internship.mea.gov.in या संकेत स्थळावर असेल आणि आवेदन, छाननी, निवड, विभागांचे वितरण, सूचना, विस्तार, प्रमाणीकरण हे सर्व मंत्रालयाच्या आंतरवासिता पोर्टलवर पाहण्यास मिळेल. प्रत्येक उमेदवाराला या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल आणि या निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रवेश प्रमाणीकरण करावे लागेल.

निवड प्रक्रिया ही दोन टप्प्यात होईल. प्राथमिक छाटणी आणि व्यक्तिगत मुलाखती. या प्रक्रियेमध्ये “कोटा कम वेटएज” प्रणालीचा उपयोग होईल. ज्यामध्ये 14 राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधील अर्जदारांना खालील तक्त्याप्रमाणे प्रत्येक सत्रात विचार केला जाईल.

पहिल सत्र (जानेवारी ते जून) –

राज्य – आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, आणि महाराष्ट्र

केंद्रशासित प्रदेश – अंदमान आणि निकोबार द्वीप, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली तथा दमण आणि दीव, दिल्ली

दुसरे सत्र (जुलै ते डिसेंबर) –

राज्य – मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तमिलनाडु, तेलंगाना, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल

केंद्रशासित प्रदेश – जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप पुडुचेरी

वरील माहितीनुसार प्रत्येक सत्रामध्ये १४ राज्यांतून प्रत्येकी दोन आंतरवासित असतील. त्याचप्रमाणे चार केंद्रशासित प्रदेशांतून दोन जण घेतले जातील. तीस टक्के ते पन्नास टक्के महिला उमेदवार असतील. शैक्षणिक कामगिरीवर प्राधान्यक्रम ठरविला जाईल आणि यासाठी प्लस टू (+२) आणि पदवी परीक्षेत मिळविलेल्या टक्केवारीचा व गुणांचा विचार केला जाईल.

उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाइन भरावे लागतील. त्यानंतर राज्यनिहाय गुणवत्ता यादी बनविली जाईल. ही यादी पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी वेगवेगळी असेल. यावेळी प्लस टू आणि पदवी परीक्षांमधील शैक्षणिक कामगिरीच्या आधारावर उमेदवारांना निवडले जाईल. टीएडीपी जिल्ह्यातील अर्जदारांना प्राधान्यक्रम दिला जाईल. मुलाखतीसाठी बोलविले जाणाऱ्या एकूण उमेदवारांची संख्या अंतर्वासितेसाठी घेतल्या जाणाऱ्या उमेदवारांच्या तुलनेत तीन पटीने जास्त असेल.

गुणवत्ता यादीनुसार निवडलेल्या उमेदवारांना दूरदृश्य संवाद प्रणाली अर्थात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने व्यक्तिगत मुलाखतीसाठी बोलावले जाईल. या निवड प्रक्रियेतून कमाल 30 उमेदवारांची निवड करून त्यांना आंतरवासिता देऊ केली जाईल. जर निवडलेल्या उमेदवारांना मधून कोणी इंटर्नशिप साठी तयार नसेल तर गुणवत्ता यादीतील त्यांच्यानंतरच्या उमेदवारांना सदर आंतरवासिता देऊ केली जाईल.

मानधन आणि हवाई तिकीट

प्रत्येक इंटर्नला दर महिन्याला येण्याजाण्याच्या खर्चापोटी दहा हजार रुपये मानधन देण्यात येईल. ही रक्कम हे ‘इकॉनोमिक क्लास’ साठी असेल आणि ती उमेदवार राहात असलेल्या राज्याच्या राजधानीपासून दिल्लीपर्यंत असेल किंवा त्याचे आधिवास राज्य किंवा तो ज्या महाविद्यालय किंवा विद्यापीठात शिकतो आहे तेथून दिल्लीपर्यंत असेल. दिल्लीमध्ये आंतरवासिता कालावधीत राहण्याच्या तसेच जेवणाचा खर्च उमेदवाराला स्वतः करावा लागेल.

आंतरवासितांचे दायित्व

या आंतरवासिता कार्यक्रमाअंतर्गत भारत सरकारचे विदेशी धोरण ठरविणे तसेच त्याची अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेसंबंधी  परिचय करुन देण्यात येईल. सर्व आंतर्वासिताला विशेष विषय देऊन विभागप्रमुख त्यावर काम करण्यासाठी मार्गदर्शन करतील. आंतरवासितांना संशोधन करावे लागेल. अहवाल लेखन, विकास संबंधी विश्लेषण, किंवा विभागप्रमुखांनी दिलेल्या इतर काम करावे लागेतील.

आंतरवासितेचा कालावधी संपताना प्रत्येक प्रशिक्षणार्थीला केलेल्या कार्याबद्दल सविस्तर अहवाल द्यावा लागेल आणि आवश्यक असल्यास सादरीकरणही करावे लागेल. या आंतरवासिता काळात जो अभ्यास, संशोधन केले जाईल, तो विदेश मंत्रालयाची बौद्धिक संपत्ती म्हणून गणली जाईल आणि आंतरवासितांना मंत्रालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्याचा उपयोग करता येणार नाही. इंटर्नना विदेश मंत्रालयाशी संबंधित कोणत्याही माहितीबद्दल गोपनीयता पाळावी लागेल,

इंटरनचे अंत्यवर्णन

विदेश मंत्रालयाच्या आंतरवासिता कार्यक्रमासाठी निवड ही पूर्णपणे आवश्यक सुरक्षा नियमांच्या समाधानपूर्वक पालन करण्यावर आधारित असेल. मंत्रालयाद्वारा कोणत्याही क्षणी कोणतेही कारण न देता आंतरवासिता रद्द केली जाऊ शकते. याबद्दल मंत्रालयाने घेतलेला निर्णय हा अंतिम असेल. एखाद्या इंटर्नला हा कार्यक्रम सोडून जायचे असल्यास एक आठवडा अगोदर मंत्रालयाला सूचित करावे लागेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...