Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘पाण्याशी आपला व्यवहार पाखंडी’ – मिलिंद बोकील

Date:

रोटरीच्या

‘जलोत्सव २०१७’ मधील व्याख्यानाला उपस्थितांची दाद 
पुणे :‘राज्याच्या १९७६ च्या जलधिनियमाची नियमावली अद्याप झालेली नसल्याने घोटाळ्यांना वाव मिळत आहे. अधिकारी आणि पुढाऱ्यांच्या संगनमताने होणारे घोटाळे ही  नियमावली नसल्याने चालूच राहणार आहेत. पाण्याच्या बाबतीत आपले समाजमन देखील पाखंडी आहे आणि आपला व्यवहारही पाखंडी आहे ‘

​ ​अशी व्यथा प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांनी सोमवारी सायंकाळी व्यक्त केली
‘रोटरी जलोत्सव २०१७ ‘मध्ये तिसऱ्या दिवशी ते ‘पाणी आणि समाजमन’ या विषयावर बोलत होते.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात सुरु असलेल्या या जलोत्सवाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे .
यावेळी विनोद बोधनकर (जल बिरादरी,

​ सागरमित्र)
​,महादेव घुमारे (
​’​

आर्ट ऑफ लिव्हींग​’,लातूर ),

​ उल्हास परांजपे (
​फेरोसिमेंट बंधारे) यांनी जलसंधारणातील यशस्वी प्रयोगांची माहिती दिली.
जलोत्सव संयोजक सतीश खाडे,

​ ​रोटरी अध्यक्ष शलाका देशपांडे,
​ ​अलका कोहली यांनी स्वागत केले. दिलीप देशपांडे यांनी सूत्र संचालन केले.
मिलिंद बोकील म्हणाले,

​ ​’महाराष्ट्र जलधिनियम १६७६ हा कायदा झाला पण त्याची नियमावली झाली नाही. नियम नसल्यानेच ४० वर्षे जलसिंचन घोटाळे चालू आहेत. अधिकारी आणि पुढाऱ्यांच्या संगनमताने होणारे घोटाळे ही नियमावली नसल्याने चालूच राहणार आहेत. पाण्याच्या बाबतीत आपले समाजमन देखील पाखंडी आहे आणि आपला व्यवहारही पाखंडी आहे ‘
पश्चिम घाटातील धरणे दुष्काळी भागाला पाणी पुरविण्यासाठी बांधण्यात आली,मात्र त्याचा उपयोग ऊस शेतीसाठी करण्यात आला. आता सहकारी साखर कारखानदारी तोट्यात असली तरी मद्यार्क निर्मितीमुळे ती फायद्यात दिसते. दुसरीकडे मोठ्या शहरात राहिले तरच पाणी मिळण्याची शाश्वती मिळत आहे .
जे बुद्धिमान अभियंते शासन सेवेत गेले ते ताटाखालील मांजर झाले आणि उर्वरित समाजातील बुद्धिमान मंडळी डरपोक पणे वागत आहेत. हा डरपोकपणा च या देशाची मोठी समस्या आहे .दुसरीकडे आपण बाटलीबंद पाण्याचे दास झाले आहोत. बाटलीबंद पाणी हे आपण समाजाला स्वच्छ पाणी पुरविण्यात अपयशी झाल्याची कबुलीच आहे. ‘
 महादेव घुमारे यांनी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग ‘च्या माध्यमातून लातूर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून झालेली ६ कोटी रुपयांच्या नदी पुनरुज्जीवनाच्या कामाच्या यशकथेची माहिती दिली. पुण्यातील राम नदीचे पुनरुज्जीवन ‘आर्ट ऑफ लिव्हिंग ‘च्या माध्यमातून हाती घेत असल्याची माहिती त्यांनी दिली .
‘प्लास्टिक मुळे नद्या आणि समुद्राचे प्रदूषण होऊ नये,

​ ​म्हणून ‘सागरमित्र ‘ या उपक्रमात पुण्यातील दीड लाख मुले सहभागी झाली असल्याची माहिती सागरमित्र आणि ‘जलबिरादरी ‘ चे विनोद बोधनकर यांनी दिली . उल्हास परांजपे यांनी फेरोसिमेंटच्या बंधाऱ्यांविषयी माहिती दिली .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...