पुणे. – उमंग भव्य रोजगार मेळाव्याचे येत्या 25 मार्चला चिंचवड येथील आयबीएमआर कॉलेज येथे सकाळी आठ ते संध्याकाळी पाच या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील पाच हजाराहून अधिक जॉब असलेल्या या मेळाव्याचा सर्व तरूणांनी फायदा करून घ्यावा असे आवाहन या मेळ्याव्याचे आयोजक ज्ञानेश्वर पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.
विविध क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध असून तरूणांपर्यंत या संधी पोहचत नाहीत, तसेच कंपन्यानांही त्यांना हवा तसा उमेदवार मिळत नाही, परंतु या रोजगार मेळाव्यामध्ये दोघांनाही चांगला फायदा होणार आहे. हजारो तरूणांमधून ते चांगला उमेदवार निवडू शकतील तर तरूणांसमोरही विविध कंपन्यांचे पर्याय उपलब्ध असतील. तरूणांना चांगली नोकरी मिळावी व त्यांचे कौशल्य देशाच्या प्रगतीसाठी उपयोगी पडावे हा प्रामाणिक उद्देश घेऊन आम्ही हा मेळावा आयोजित केला आहे, असे प्रतिपादन त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.
मॅन्युफॅक्चुरींग, आयटी, बँकींग, फायनान्स, इनश्युरन्स, लॉजिस्टीक्स, फुड चेन, हॉटेल इंडस्ट्री आणि इतर अशा विविध क्षेत्रातील 70हून अधिक कंपन्या यामध्ये सहभागी होणार असून 5000हून अधिक नोकरीच्या संधी येथे उपलब्ध आहेत. यावेळी येताना उमेदवाराने सोबत कमीत कमी सहा रिझ्यूम आणणे गरजेचे आहे. तसेच शुन्य ते पाच वर्षापर्यंतचा अनूभव असलेले उमेदवार या रोजगार मेळाव्यामध्ये येण्यासाठी पात्र असतील. या उमेदवारांचे त्याठिकाणीच किंवा ऑनलाईन नोंदणी करून त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी चेतन गनेडीवाल, अर्चना पाटील, आर.के.सिंन्हा आणि स्वाती आर हे टिम मेंबर मेहनत करत आहेत.
उमेदवार www.jobsandhi.com URL: http://www.jobsandhi.com/users/jobseekerregister या लिंकवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात.अधिक माहितीसाठी 7722034560 या क्रमांकावर संपर्क साधावा.