पुणे- मराठी सिनेमा आणि मराठी भाषा यासाठी तरी मिडिया ने ‘मिडीया पॅकेज ”मिडिया नेट’ पद्धती बंद करावी अशी मागणी आज भारत सरकारच्या कला व सांकृतिक मंत्रालयाचे सदस्य आणि शाळा आणि फँड़री सह अनेक चित्रपटांचे पुण्यातील निर्माते निलेश नवला खा यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली .
ते म्हणाले , पूर्वीच्या काळात म्हणजे ४ वर्षांपूर्वी मराठी सिनेमांना मराठी वृत्तपत्रे उचलून धरीत . त्यांचे कौतूक करीत आणि लहानसहान चुका दुर्लक्षितही करीत . मराठी भाषेच्या प्रेमापोटी मराठी मिडिया त्या काळात नेहमीच मराठी सिनेमाच्या बाजूने ठाम उभा राहत आणि मराठी रसिकांना आपल्या माध्यमाद्वारे हवी ती माहिती पुरवण्याचे काम दिलदार पद्धतीने करीत . पण आता गेल्या सुमारे ४ वर्षापासून मिडीयाप्रसिद्धीच्या नावाखाली मराठी सिनेमांच्या निर्मात्यांना कात्रीत पकडायला सुरुवात झाली आहे .पण एकीकडे सिनेमा मेकिंगचा खर्च आणि दुसरीकडे त्याहून दुप्पट असा पॅकेजेसचा खर्च यामुळे निर्मात्यांपुढे मोठ्ठे संकट उभे राहिले आहे ..पहा आणि ऐका नेमके निलेश नवलाखा काय म्हणाले ….