मुख्यमंत्र्यांसमवेत विविध मागण्यांवर मार्ड पदाधिकाऱ्यांची बैठक; योग्य तो तोडगा त्वरित काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

Date:

मुंबई दि ४: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपल्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याबद्धल निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने समाधान व्यक्त केले आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली.  यावेळी  सकारात्मक चर्चा होऊन ‘मार्ड’ने मांडलेल्या मुद्द्यांवर योग्य तो तोडगा त्वरित काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

कोरोना काळात निवासी डॉक्टरांनी केलेली अतुलनीय कामगिरीसाठी त्यांचे कौतुक करून मुख्यमंत्री म्हणाले की, या डॉक्टरांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला जाईल.  यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त मनोज सौनिक, संचालक, वैद्यकीय शिक्षण डॉ दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी  उपस्थित होते.

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे, पालिकेच्या महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमधून जीएसटी कपात बंद करणे यासंदर्भात मार्डने संप पुकारला होता.

शैक्षणिक शुल्क माफी तसेच जीएसटीसंदर्भात  मुख्यमंत्र्यांनी वित्त विभाग तसेच पालिकेस तांत्रिक बाबींचा अभ्यास करून  योग्य तो तोडगा काढण्यासाठी त्वरित पावले उचलावी असे सांगितले. त्याचप्रमाणे शासकीय तसेच पालिकेतील निवासी डॉक्टरांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्धल योग्य ती दखल घेऊन त्यांना कशा प्रकारे प्रोत्साहन देता येईल ते निश्चित करण्याचेही निर्देश दिले.

यावेळी मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले व राज्य शासन योग्य ती पावले उचलेल असा विश्वास व्यक्त  केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

साताऱ्यात चिमुकल्यांच्या हृदयाला मिळणार नवी उभारी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर संपन्न सातारा:राज्याचे...

‘पीएमआरडीए’ मुख्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण पुणे :...