पुणे- वितरक आणि थिएटर चालकाकडून मराठी निर्मात्यांची होणारी आर्थिक छळवणूक दिवसेंदिवस वाढतच असल्याचा आरोप निर्माते निलेश नवलाखा यांनी येथे केला तर निर्मात्यांच्या या आर्थिक पिळवणूक विरोधात महामंडळ रस्त्यावर उतरणार … असा पवित्रा मराठी चित्रपट महामंडळा चे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी घेतला आहे .
वैयक्तिक निर्मात्याला वितरक आणि थिएटर चालकाकडून अक्षरशः नागवले जाते आहे . मराठी सोडून सर्व भाषिक चित्रपट शेअरिंग बेसिसवर घेण्यात येतात . पण वैयाक्तिक मराठी निर्माता असेल तर त्याला भाड्यानेच थिएटर घ्या असे सांगून लुबाडले जाते . यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महामंडळाने गठीत केलेल्या लवादाचा निर्णय सुद्धा हि मंडळी जुमानत नाही . मराठी निर्मात्याकडून चित्रपट लावण्यापूर्वी आगावू पैसे घेतात आणि अन्य भाषिक चित्रपटांसाठी मात्र त्यांच्या निर्मात्याना माता आगावू पैसे देवून चित्रपट लावून घेतात . अशी महारष्ट्रात मराठी चित्रपट निर्मात्यांची अवस्था मोठ्ठी कठीण झाल्याचे नवलाखा यांनी सांगितले .काही मक्तेदारी झालेले चॅनेल् वाले राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले मराठी चित्रपट सुद्धा नाकारतात .. याला काय म्हणावे ? मराठी सिनेसृष्टीत स्पर्धा असावी पण केवळ आर्थिक ताकदीवर चांगल्या कलाकृती दाबून टाकण्याची वृत्ती नसावी , अशा कलाकृतींना वाव दिल्यास मराठी सिनेमे आणखी प्रगल्भ होतील असे ते म्हणाले .
पहा आणि एका नेमके निलेश नवलाखा म्हणाले तरी काय ?