मुंबई- इडी च्या कारवाईनंतर खासदार संजय राऊत यांनी ‘असत्यमेव जयते ‘असे ट्वीट केले तर माध्यमांशी बोलताना आम्ही कष्टाच्या पैशाने जमीन घेतली , नातेवाईकांनी स्वतःच्या कमाईने घेतलेल्या त्या जागा आहेत मराठी माणसाचे राहते घर जप्त केलेत त, मी तुमच्या बापाला घाबरणार नाही! अशी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमाशी बोलताना संजय राऊत म्हणाले,फ्लॅटबद्दल बोलायचे झाल्यास, माझे एका मराठी माणसाचे राहते घर जप्त करण्यात आले आहे. आता भाजपवाले फटाके फोडत असतील. पण, यातूनच लढण्याची प्रेरणा मिळत असते. या प्रॉपर्टीमध्ये कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार झालेले आढळले तर मी स्वतः माझी संपत्ती भाजपला दान करेल असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे. एवढेच नव्हे, तर संपत्तीची व्याख्या बदलावी लागेल असेही राऊत म्हणाले. माझे राहते घर आणि अलिबागमधील प्लॉट ही तुम्हाला माझी संपत्ती वाटत असेल तर हे चुकीचे आहे. मराठी लोकांच्या बाबतीत आणि महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते अख्ख्या महाराष्ट्राची जनता पाहत आहे. तुमचा बाप जरी खाली आला तर त्याला सुद्धा घाबरणार नाही. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा चेला आहे. मी कुणालाच घाबरत नाही असेही राऊत पुढे बोलताना म्हणाले आहेत.
दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याशी बोलणे झाले अशी माहिती सुद्धा संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आम्ही काय प्रॉपर्टीवाले आहोत का. 2009 साली आम्ही कष्टाच्या पैशाने जमीन घेतली. त्यावेळी कुणी काही चौकशी केली नाही. आता म्हणे, मनी लाँड्रिंग प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 2009 मध्ये घेतलेली ती प्रॉपर्टी एक एकर सुद्धा नाही. आमच्या नातेवाईकांनी स्वतःच्या कमाईने घेतलेल्या त्या जागा आहेत.
“अशा कारवायांनी संजय राऊत झुकणार नाही”
दरम्यान, किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “किरीट सोमय्या चु*** आहे. महाराष्ट्रद्वेष्टा आहे. जो माणूस मराठीच्या विरोधात कोर्टात जातो, तो आम्हाला अक्कल शिकवणार का? कोण आहे तो?” असं राऊत म्हणाले“अशा कारवायांनी संजय राऊत किंवा शिवसेना झुकणार नाही, वाकणार नाही. याच घरात येऊन काही महिन्यांपूर्वी भाजपाच्या लोकांनी महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी मदत करा, अशा धमक्या दिल्या होत्या. नाहीतर तुम्हाला खूप संकटांना सामोरं जावं लागेल, असं म्हटलं होतं”, असं राऊत यावेळी म्हणाले आहेत.