मुंबई – शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांच्यावर ईडीच्या कारवाईबाबत जोरदार वाद झाल्यानंतर आता थेट संजय राऊत यांच्यावरच ईडीनं कारवाई केली आहे. संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये दादरचा एक फ्लॅट आणि अलिबागमधील 8 प्लॉट्सचा समावेश आहे. ईडीकडून ही मंगळवारी ही कारवाई करण्यात आली आहे. 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने ही कारवाई केली. या प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पाठपुरावा केला होता.