पुणे : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १२६व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला रविवारी महात्मा फुलेवाडा येथे ज्योती वंदना दीपोत्सव कायक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सत्यशोधक विचारांच्या कार्यकर्त्यांनी भावपूर्ण वातावरणात लावलेल्या सुमारे दहा हजार दिव्यांनी फुलेवाडा उजळून निघाला.दीप्ती चौधरी ,कमलताई ढोलेपाटील यांच्या सह असंख्य महिला ,पुरुष आणि तरुणाई ने या कार्यक्रमात सहभाग घेतला