Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे राज्यातील ८ हजार कर्मचारी संपावर

Date:

पुण्यातील ५०० कर्मचाऱ्यांचा सहभाग ,कामकाज ठप्प 
पुणे :
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला शासनात समाविष्ट करावे ,कर्मचाऱ्यांचे वेतन -भत्ते शासनामार्फत देण्यात यावेत या मागणीकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी महासंघाच्या राज्यातील ८ हजार कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे अस्त्र उचलले आहे . पुण्यातील ५०० अधिकारी ,कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २०१५ च्या नागपूर अधिवेशनात या मागण्यांवर ३ महिन्यात कार्यवाही करू ,असे आश्वासन दिले होते ,१४ महिन्यात कोणतीही कार्यवाही न झाल्याने मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संप ६ मार्चपासून सुरु करण्यात आल्याने प्राधिकरणाचे कामकाज ठप्प झाले आहे .
मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु आहे ,तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे . पुण्यातील लष्कर भागातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर धरणे आंदोलनात सर्व अधिकारी -कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आणि घोषणाबाजी केली .
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघर्ष समिती ,कर्मचारी महासंघ ,महाराष्ट्र पाणी पुरवठा जलनिःस्सारण अभियंता संघटना यांचे प्रतिनिधी ,पदाधिकारी सहभागी झाले आहेत . बी  डी यमगर (मुख्य अभियंता ),एन एन भोई (कार्यकारी अभियंता ),वैशाली आवटे (कार्यकारी अभियंता ),बी पी पिंगळे ,एन पी कुलकर्णी ,तसेच महासंघाचे  अध्यक्ष एड . आर .बी .शरमाळे ,कार्याध्यक्ष बबलू म्हेत्रे ,खजिनदार सोमा दाते ,सरचिटणीस आर . व्ही . जाधव ,सलीम शेख ,संजय केळकर ,दीपक म्हस्के ,अग्निहोत्री इत्यादी पुण्यातील आंदोलनात सहभागी झाले
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी- ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

पुणे : एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा...

अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल मुलांच्या किलबिलाटाने गजबजले

पुणे- आज महाराष्ट्र राज्यातील बहुतांश आणि पूणे मनपाच्या सर्व...