पुणे – कॉबेक्स मास्टर्स 2018 च्या पुण्यात संप्पन झालेल्या अंतिम फेरीमध्ये डोटा २ आणि सीएस गो ह्या खेळांमध्ये आर ओ जी टायटन्स आणि मॅग पुणे फाईव्ह ने जी.जी.वेलप्लेड आणि टीम एनएस के ला मात देऊन विजय मिळवला, भारतात ई- गेमिंगची अश्या प्रकारे खेळली जाणारी ही पहीली राष्ट्रीय स्पर्धा आहे.
टूर्नामेंटमधील विजेत्यांना ट्रॉफी बरोबरच प्रत्येकी 30,000 / – आणि कॉबेक्स मर्चंडाइझ मिळाले. उपविजेत्यांना प्रत्येकी रु. 20,000 मिळाले. हा अंतिम सामना कोंढव्यामधिल मॅग कॅफे मध्ये आयोजित करण्यात आला होता. ह्यामध्ये ई -गेमिंगची आवड असणार्या तरुण खेळाडूंनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला होता.
आपले विचार व्यक्त करताना आर ओ जी टायटन्सचा कर्णधार दर्शन म्हणाला कि, “आजचा दिवस आमच्यासाठी एक स्मरणीय दिवस आहे कारण आम्ही भारतातील सर्वात मोठ्या गेमिंग स्पर्धेच्या दुस-या टप्प्यासाठी पात्र ठरलो आहोत.” आतापर्यंत आम्ही अश्या स्थानिक स्पर्धांसाठी खेळलो जेथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाव नव्हता. कॉबेक्स मास्टर्स ने प्रथमच आम्हाला एक मोठ्या पातळीवर खेळण्याची संधी दिली. आपल्या देशात आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. आता अामचे ध्येय आहे ही टूर्नामेंट जिंकणे. “
टीम मॅग पुणे फाईव्हचा कर्णधार रोशन म्हणाला कि, “सीएस गो खेळाकडे आम्ही गंमत म्हणून वळलो होतो, पण कॉबेक्स मास्टर्स ने ह्या खेळाकडे व्यावसायिक दृष्टीकोनातुन आणि करिअर म्हणुन पहावयास शिकवले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे आमचे स्वप्न आहे आणि आता आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. “पुण्यातील पहिल्या टप्प्याच्या यशस्वी निष्कर्षानंतर आता सर्वांचे डोळे फेज 1 च्या उर्वरित भागावर आहेत, सर्वोत्कृष्ट संघासह कट्टर प्रतिस्पर्ध्यांना तय्यार करून कोबेक्सने भारताला जागतिक दर्जाच्या गेमिंग स्पर्धेपर्यांत पोहचवले आहे.