Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी महायुतीची जय्यत तयारी पूर्णत्वास

Date:

 – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सभास्थळ पाहणी
पुणे, –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी पुण्यातील टिळक रस्त्यावरील सभा महाविद्यालय या ठिकाणी महायुतीची जाहीर प्रचार सभा संपन्न होणार आहे. या सभेकरीता एक लाख लोक उपस्थित राहतील यादृष्टीने महायुती प्रयत्नशील असून सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीचे नेते या सभेस उपस्थित राहणार आहे. सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ,मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे,  प्रवक्ते संदीप खर्डेकर, श्रीनाथ भिमाले, अजय खेडकर, शिवसेना नेते किरण साळी यांनी सभा स्थळी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला आणि आवश्यक त्या सूचना केल्या.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम महाराष्ट्रात मंगळवारी दोन सभा सोलापूर आणि पुणे या ठिकाणी होत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 58 विधानसभा मतदारसंघ असून त्यामध्ये मोदींच्या सभेमुळे सकारात्मक परिणाम निवडणुकीत दिसून येईल. पंतप्रधान मोदी यांची सभा ही पुणेकरांसाठी पर्वणी ठरेल .पुणेकर नेहमी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतास उत्सुक असतात ,त्यांच्या सभेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. भविष्यातील देशाची जडणघडण आणि महाराष्ट्रचे विकासा मधील योगदान याबाबत ते भाष्य करतील. पोलिसांनी देखील चांगल्या प्रकारे वाहतूक आणि गर्दी नियोजन व्यवस्था शहरात ठिकठिकाणी केलेली आहे. पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघ असून यापैकी 18 मतदारसंघ सध्या महायुती सोबत असून यंदाच्या निवडणुकीत 21 पैकी 21 मतदार संघ महायुतीकडे येतील असा आम्हाला दृढ विश्वास आहे .
भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे म्हणाले,  सभा स्थळी  71 हजार खुर्चीची व्यवस्था करण्यात आलेली असून मैदानाच्या परिसरात आणि बाहेर देखील स्क्रीन व्यवस्था करण्यात आलेली आहे. तब्बल एक लाख लोक सभेसाठी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. तीन ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे.महायुतीचे सातारा आणि पुणे जिल्ह्यातील सर्व महायुती उमेदवार सभेस उपस्थित राहतील.m

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ट्रेलरमधील सळ्या केबिनमध्ये घुसल्या, चालकाचा दुर्दैवी अंत

पुणे-पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....

नवी मुंबईतील कंपनीत गॅस गळती:कामगारांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम, 25 महिला बेशुद्ध

नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी गॅस गळतीची घटना...

PMRDA आयुक्त यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दहाव्या वर्धापन...